मोठी बातमी : 'लाडकी बहीण' योजनेला निवडणूक आयोगाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला झटका

January 2026 installment News : आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून जानेवारी 2026 चा लाभ आधीच देण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली होती.
ladki bahin yojana
ladki bahin yojanaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून जानेवारी 2026 चा लाभ आधीच देण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली होती. मकरसंक्रांती सणापूर्वी डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांना वितरित करण्यात येणार होते. मात्र, 'लाडकी बहीण' योजनेचा जानेवारीचा हप्ता ॲडव्हान्स देण्यास निवडणूक आयोगाने 'ब्रेक' लावला आहे. आचारसंहितेमुळे ॲडव्हान्स हप्ता देता येणार नसल्याचे सांगत राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेचा दाखला देत निवडणूक आयोगाने जानेवारी 2026 चा लाभ आधीच देण्यास बंदी घातली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता देतील असे स्पष्ट केले आहे.

ladki bahin yojana
BJP Trouble : 'त्या' महिला अधिकाऱ्याची चूक भाजपला महागात पडणार? ऐन निवडणुकीत विरोधकांकडून टार्गेट!

राज्य सरकारला जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. त्यामुळे आता महिलांना केवळ डिसेंबर महिन्याचा हप्ता देता येणार आहे. याबाबत राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकाचवेळी दोन हप्ते देता येणार नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्य सरकारला त्याबाबत कळवले आहे.

ladki bahin yojana
BJP Vs Shivsena : भाजपने अख्खा काँग्रेस पक्ष फोडला... पण उपयोग शून्य : श्रीकांत शिंदेंच्या तिरक्या चालींनी रवींद्र चव्हाण 'चेकमेट'

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे गेल्या (नोव्हेंबर, डिसेंबर) दोन महिन्यांचे हप्ते प्रलंबित आहेत किंवा ज्यांचा नियमित लाभ आहे, तो सुरू राहील. मात्र, जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.

ladki bahin yojana
BJP vs NCP : 'मोफत शिक्षणाची फाइल अडवणारे, मोफत प्रवास काय देणार? विजयी होणार नाही हे माहिती असल्यानेच अजित पवारांची घोषणा...', भाजपचा हल्लाबोल

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत चर्चा सुरू आहे. डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या दाव्याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने थेट राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते.

ladki bahin yojana
Shiv Sena UBT Politics : उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराने, भाजपात गेलेल्या विनायक पांडेंचा पंचनामाच केला!

काँग्रेसने (Congress) केलेल्या आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांना पत्र पाठवले असून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाने सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले होते. याबाबतची माहिती राज्य सरकरकडून देण्यात आल्यानंतर या सूचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींना मकर संक्रातीपूर्वी देण्यात येणार असल्याची पोस्ट भाजपचे मंत्री गिरीश महाजन, मुंबईतील महापालिका निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी केली होती. या पोस्ट समोर आल्यानंतर काँग्रेसनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम मतदानानंतर देण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं होतं.

ladki bahin yojana
Congress Corporator Join BJP : सत्तेची साझेदारी! महाराष्ट्रातील राजकारणात नेमकं चाललंय काय? काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com