Mumbai News : अंबरनाथ नगरपरिषदेचे राजकारण गेल्या काही दिवसापासून चांगलेच तापले होते. सोमवारी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीवेळी मोठी राजकीय घडामोड पाहवयास मिळाली. अंबरनाथमध्ये अख्खा काँग्रेस पक्ष फोडूनही भाजपला अपयश आले आहे. खासदार श्रीकांत शिंदेंच्या तिरक्या चालीमुळे रवींद्र चव्हाण 'चेकमेट' झाले आहेत. याठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक असतानाही सदाशिव पाटील हे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले.
सोमवारी निवडीपूर्वी भाजप (BJP) व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका परिसरात मोठी घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची गद्दार म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोर आल्याने एकच गोंधळ उडाला. गेल्या काही दिवसांपासून उपनगराध्यक्ष निवडीवरून गदारोळ सुरु असल्याचे दिसत आहे.
सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत मोठी चुरस पाहवयास मिळाली. अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये एकूण 59 नगरसेवक आहेत. या नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) 12 नगरसेवक निवडून आले होते. भाजपने आपले संख्याबळ वाढवण्यासाठी काँग्रेससोबत युती केली होती, ज्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली. काँग्रेसने भाजपला साथ देणाऱ्या 12 नगरसेवकांना निलंबित केले होते. या नगरसेवकांचा निलंबनानंतर अवघ्या काही तासात भाजपमध्ये प्रवेश झाला होता. त्यामुळे भाजपचे स्वबळावर असलेले 14, काँग्रेसमधून आलेले 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि 1 अपक्ष अशा एकूण 31 जणांचा मिळून 'अंबरनाथ विकास आघाडी' नावाचा एक गट जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर नोंदवला होता.
या आघाडीकडे बहुमताचा आकडा 31 पेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले असतानाच तीन दिवसांपूर्वी आणखी एक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांनी अचानक शिवसेना शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आधीच 27 नगरसेवक आहेत, त्यामुळे या चार नगरसेवकांच्या जोरावर शिंदे गटाचे पारडे जड झाले होते.
सोमवारी निवडणुकीपूर्वी आघाडीने 'व्हीप' काढल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नगरसेवकांसमोर कायदेशीर पेच निर्माण झाला होता. मात्र, अंबरनाथमध्ये अख्खा काँग्रेस पक्ष फोडूनही भाजपला अपयश आले आहे. खासदार श्रीकांत शिंदेंच्या तिरक्या चालीमुळे रवींद्र चव्हाण 'चेकमेट' झाले आहेत. याठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक असताना सदाशिव पाटील हे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सदाशिव पाटील यांना 32 मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील भाजपप्रणीत आघाडीच्या उमेदवाराला 28 मते मिळाली.
अंबरनाथ नगरपालिकेत सोमवारी सर्वसाधारण सभेवेळी जोरदार गोंधळ पाहवयास मिळाला. भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका परिसरात मोठी घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची गद्दार म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोर आल्याने एकच गोंधळ उडाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.