Ladki Bahin Yojana PIL: फडणवीस सरकारची 'लाडकी बहीण योजने'बाबत कोर्टात मोठी माहिती; 'हे' आहे प्रकरण

Pollitical News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून बाजू मांडली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महायुती सरकारने राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना लागू केली होती. या माध्यमातून महिलाना 1500 रुपये दिले जात आहेत. त्यानंतर सत्ताधारी व विरोधकाकडून एकेमकावर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण तापले होते. त्यातच विविध योजनांवर आक्षेप घेत काँग्रेस नेते अनिल वडपल्लीवार यांनी जनहित याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून बाजू मांडली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार आहे.

Ladki Bahin Yojana
Walmik Karad Wife Statement : निवडून यायला मोठं व्हायला अण्णा पाहिजे, आता अण्णाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचे का?

राज्य सरकारकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोफत लाभ देणाऱ्या योजनामुळे राज्याच्या अर्थकरणावर त्याचा परिणाम होईल, असे या याचिकेत म्हटले होते. दरम्यान, यावर खंडपीठाने सुरुवातीला 23 ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर 3 डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याच्या सूचना नागपूर खंडपीठाने दिल्या होत्या. यावर राज्य सरकारने पुन्हा वेळ वाढवून मागितल्याने 15 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याची वेळ नागपूर खंडपीठाने वाढवून दिली होती.

Ladki Bahin Yojana
Walmik Karad Wife Statement : निवडून यायला मोठं व्हायला अण्णा पाहिजे, आता अण्णाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचे का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला घेऊन सध्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिकेची सुनावणी सुरु आहे. यावर बोलताना राज्य सरकारने आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमूळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. असे म्हणत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

Ladki Bahin Yojana
Walmik Karad Custody : मोठी बातमी! वाल्मिक कराड घुले अन् चाटेच्या संपर्कात? देशमुखांना दिली होती धमकी? सात दिवसांची पोलिस कोठडी

पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला

लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस (Congress) याचिकेवर राज्य सरकारला तूर्तास दिलासा मिळाला होता. अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी संबंधित विभागाच्या हेड अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे शासनाने आपल्या प्रतिज्ञापत्रात आज म्हटले आहे. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार आहे.

Ladki Bahin Yojana
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख यांची हत्या का झाली? सीआयडीने खरे कारण पहिल्यांदाच आणले समोर; कोर्टात केला 'हा' युक्तिवाद...

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरुन घेण्यात आले होते. आता राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ज्या महिला लाभार्थी पात्र नाहीत, त्यांनी योजनेतून स्वत:हून नाव काढून टाकावे असे म्हटले आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडण्याची नेमकी प्रक्रिया काय याबाबतचे चित्र स्पष्ट नाही. त्यामुळं संभ्रमाचं वातावरण आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2 कोटी 52 लाख महिलांना 1500 रुपये दिले आहेत.

Ladki Bahin Yojana
Supriya Sule : 'देशमुख, राऊत, मलिक यांना ईडी लावता, मग कराडला का नाही?', सुप्रिया सुळे यांचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com