Lok Sabha Election News : महायुतीत भाजप मालामाल; पहिल्यांदाच लढणार सर्वाधिक जागांवर

BJP Politics : यंदाच्या निवडणुकीत भाजपने 400 पारचे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी देशभरात सर्वाधिक जागांवर उमेदवारही उभे केले आहेत. महाराष्ट्रातही भाजप पहिल्यांदाच सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवत आहे.
Lok Sabha Election News
Lok Sabha Election NewsSarkarnama

Pune News : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election News) महायुतीतील जागावाटपाचे चित्र अखेर आज स्पष्ट झाले. राज्यात भाजपच्या वाट्याला 48 पैकी सर्वाधिक 28 जागा आल्या असून युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या पदरात एवढ्या जागा पडल्या आहेत. त्यामुळे यावेळी जागावाटपात भाजप मालामाल झाले आहे. मागील निवडणुकीपर्यंत भाजपला सर्वाधिक 26 जागांपर्यंतचाच पल्ला गाठता आला होता.

महाराष्ट्रात (Maharashtra) काही जागांवरून महायुतीच्या जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) तिढा निर्माण झाला होता. काही दिवसांपुर्वी महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) सर्व जागांची घोषणा करत आघाडी घेतली होती. पण महायुतीमध्ये प्रामुख्याने ठाणे, नाशिक, पालघर या जागांचा तिढा सुटता सुटत नव्हता.

Lok Sabha Election News
Lok Sabha Election 2024 : दिघे-शिंदेंचे विश्वासू भिडणार; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात माजी महापौर झुंजणार

अखेर आज ठाणे आणि नाशिक मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. तसेच पालघरची जागा भाजपच्या (BJP) पारड्यात पडल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटपाचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजप 28 जागा लढवणार आहे. तर शिवसेनेला (Shiv Sena) 15, राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली आहे. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागावाटपामध्ये भाजपने इतर मित्रपक्षांना धोबीपछाड केले आहे. एकूण 48 पैकी 28 जागा मिळवत भाजप युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या जागांवर लढणार आहे. भाजपने 2009 आणि 2019 मध्ये प्रत्येकी 26 जागा लढवल्या होत्या. तर 2014 मध्ये युतीत भाजपला 24 जागा मिळाल्या होत्या. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. त्याआधीच्या निवडणुकांमध्ये भाजपला फारशा जागा आणि यशही मिळालेले नाही. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयाची गॅरंटी वाटत असल्याने सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. शिवसेनेतील फुटीमुळे भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली. फुटीनंतर शिंदेंकडे 13 खासदार आले. त्यामुळे सेनेचा मागील निवडणुकीप्रमाणेच 22 जागांवरील दावा साहजिकच मागे पडला. आता सेनेला 15 जागा मिळाल्या आहेत.

Lok Sabha Election News
Jalna Lok Sabha: विकासावर बोला! दानवेंचं आव्हान काळेंनी स्वीकारलं...

मागच्या निवडणुकीच्या तुलनेत सेनेला कमी मिळालेल्या सात जागांपैकी राष्ट्रवादीला चार आणि रासपला एक जागा गेली आहे. तर अधिकच्या दोन जागा भाजपने आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरी आता किती जागांवर मतदार विजयाची गॅरंटी देणार, हे चार जूनला समजेल. 

महाविकास आघाडीत ठाकरे वरचढ

महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना जागावाटपात वरचढ ठरली आहे. ठाकरेंच्या सेनेला 21 जागा (मागील निवडणुकीच्या तुलनेत एक जागा कमी) मिळाल्या आहेत. राज्यात भाजपनंतर सर्वाधिक जागांवर ठाकरेंची सेना लढत आहे. त्यानंतर काँग्रेसला 17 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दहा जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार राज्यात भाजप सर्वाधिक जागा लढत असून त्याखालोखाल ठाकरेंची सेना दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे.

Lok Sabha Election News
Naresh Mhaske News : 'आमचे काम 365 दिवस सुरू त्यामुळे भीती वाटत नाही', नरेश म्हस्के यांची पहिली प्रतिक्रिया !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com