Devendra Fadnavis news : राज्यात आणखी 145 उड्डाणपूल होणार; तीन वर्षांचा आराखडा तयार...

Maharashtra flyovers, MahaRail, Maharashtra infrastructure : कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती सरकारने महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government news : महाराष्ट्रात महारेलकडून पुढील तीन वर्षांत आणखी १४५ उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. त्यामध्ये रेल्वे फाटकांवरील 65 आणि इतर 80 उड्डाणपुलांचा समावेश आहे. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्याच्या दिशेने महारेलकडून ही पावले टाकली जात आहेत.

नागपूरमध्ये रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राज्यातील 4 रोड ओव्हर ब्रिज (ROB), 4 अंडरपास (सबवे) आणि 1 रोड अंडरब्रिजचे (RUB) लोकार्पण करण्यात आले.महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MahaRail), महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा या कामांमध्ये सहभाग आहे.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती सरकारने महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले. केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून त्यासाठी सहकार्य मिळाले आहे. उर्वरित रेल्वे फाटकांच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी महारेलच्या माध्यमातून सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यंमत्र्यांनी दिली.

CM Devendra Fadnavis
Manmohan Singh news : मी आत्महत्या करेन! माजी PM मनमोहन सिंग यांच्याबाबत तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांकडून मोठा खुलासा

महारेलने मुंबईत अनेक कामे वेळेत पूर्ण केली आहेत. तसेच 145 उड्डाणपुलांचा आराखडा सादर केला असून त्यामध्ये रेल्वे फाटकांवरील 65 आणि इतर 80 उड्डाणपुलांचा समावेश आहे. या आराखड्याला राज्य सरकार मान्यता देत असून, महारेलकडून पुढील 3 वर्षांत हे सर्व उड्डाणपूल पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्‍यांनी व्यक्त केला.

CM Devendra Fadnavis
Rahul Gandhi news : राहुल गांधी 20 दिवसांपासून नेमके आहेत कुठे? अखेर काँग्रेसने 17 तारखेचा प्लॅन ठरविला...

महत्वपूर्ण प्रकल्प हाती

मागील 10 वर्षांत नागपूर शहराचा झपाट्याने विकास झाल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आगामी काळात नागपूर शहर, विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या विकासाला गती मिळेलच, शिवाय मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com