Teacher Recruitment: शिक्षक भरतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा! मुलाखतींची मुदत वाढली; आता 12 डिसेंबरपर्यंत संधी

Teacher Recruitment TAIT 2025:महाराष्ट्रातील TAIT 2025 शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणी पूर्ण करण्यासाठी 12 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Maharashtra Teacher Recruitment 2026
Maharashtra Teacher Recruitment 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Teacher Recruitment News: राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’ (TAIT) च्या आधारे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील मुलाखती आणि अध्यापन कौशल्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

नियुक्ती प्राधिकारी आणि शिक्षणाधिकारी स्तरावरील कार्यवाही अद्याप पूर्ण न झाल्याने आता 12 डिसेंबर 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भातनियुक्ती प्राधिकारी आणि व्यवस्थापनांसाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या निर्णयाचा फायदा विशेषतः खासगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातींमधील रिक्त पदांसाठी मुलाखतीसह फेरफेरीत निवड झालेल्या उमेदवारांना होणार आहे. संबंधित संस्थांना निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे.

नेमकी कोणत्या उमेदवारांसाठी आहे मुदतवाढ?

खासगी व्यवस्थापनांच्या जाहिरातींमधील रिक्त पदांसाठी मुलाखतीसह फेरफेरीत एकूण 10,328 रिक्त जागांवर मुलाखती घेण्यात येणार आहेत. याशिवाय अध्यापन कौशल्यासाठी 27,154 प्राधान्यक्रमानुसार शिफारस झालेल्या उमेदवारांची नियमित फेरीतील (Regular Round) सर्वसाधारण गुणवत्ता यादी 31 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

Maharashtra Teacher Recruitment 2026
Anganwadi Sevika Salary: अंगणवाडी सेविका, मदतनीसांसाठी मोठी बातमी! प्रोत्साहन भत्त्याचे निकष बदलले; आता किती मिळणार पैसे?

या निवड प्रक्रियेतील मुलाखत आणि अध्यापन कौशल्याची कार्यवाही 3 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. याबाबत उमेदवारांची माहिती संबंधित शैक्षणिक व्यवस्थापनांना 31 ऑक्टोबर रोजीच कळविण्यात आली होती. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी स्तरावरही पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

नियुक्ती प्रक्रियेसाठी 12 डिसेंबरपर्यंत मुदत

मात्र, नियुक्ती प्राधिकारी आणि शिक्षणाधिकारी स्तरावरील आवश्यक कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे उमेदवारांची निवड प्रक्रिया रखडू नये, यासाठी 12 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित व्यवस्थापनांनी मुलाखती आणि अध्यापन कौशल्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे सूचित करण्यात आले आहे.

Maharashtra Teacher Recruitment 2026
Maharashtra Cabinet Decisions: खासगी शाळांसाठी नवा कायदा, वसतिगृह भत्ता वाढणार; शिक्षण क्षेत्रासाठी 5 मोठे निर्णय

गुणांकातील चूक असल्यास काय कराल?

उमेदवारांच्या गुणांकनासाठी आवश्यक असलेल्या अर्हतेच्या नोंदींमध्ये काही चुकीची माहिती नोंदवली गेली असल्यास संबंधित व्यवस्थापनांना ती दुरुस्त करण्याची सूचना करण्यात आली आहे. योग्य मूल्यांकनासाठी आवश्यक पुराव्यांसह पवित्र प्रणालीच्या [edupavitra2025@gmail.com](mailto:edupavitra2025@gmail.com) या ई-मेलऐवजी [edupavitra2025@gmail.com](mailto:edupavitra2025@gmail.com) या अधिकृत ई-मेलवर तातडीने संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

Maharashtra Teacher Recruitment 2026
School Assessment: मुख्याध्यापकांनो, तयारी ठेवा! राज्यातील 540 शाळांचे त्रयस्थ मूल्यांकन होणार; 60 दिवसांची डेडलाइन

ई-मेलवर संपर्क साधा

उमेदवारांचे योग्य मूल्यांकन करून निवड प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या नोंदी दुर्लक्षित करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. व्यवस्थापनांना काही अडचणी असल्यास याच ई-मेलवर संपर्क साधता येणार आहे.

Maharashtra Teacher Recruitment 2026
CET Exam: पहिल्या परीक्षेत कमी गुण मिळाले? चिंता नको! वर्षातून दोनदा CET देण्याची संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.