Maharashtra construction workers : महिन्याला सुमारे 2 लाख वेतन, महाराष्ट्रातील 60 बांधकाम कामगार इस्त्रायलला जाणार; विमान तिकिटे-व्हिसाही मिळाला...

Israel construction jobs, 2 lakh salary Israel job : G2G उपक्रमातून इस्रायलमध्ये ५ वर्षांसाठी तेल अवीव येथे काम; प्लास्टरिंग, टायलिंग, फ्रेमवर्क व आयर्न बेंडिंग कौशल्याला दरमहा सुमारे २ लाखांचे मानधन.
Maharashtra construction workers, CM Devendra Fadnavis
Maharashtra construction workers, CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra government Israel jobs : महाराष्ट्रातील कुशल बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी Government-to-Government (G2G) पद्धतीने उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ६० कुशल बांधकाम कामगारांची पहिली तुकडी गुरूवारी इस्त्रायलला रवाना होणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १०३ कामगारांची निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवड झालेल्या ६० कामगारांच्या पहिल्या तुकडीला बुधवारी प्रातिनिधिक स्वरूपात विमान तिकिटे व व्हिसाचे वितरण केले. राज्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि एनएसडीसी इंटरनॅशनल यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

दोन लाख रुपये वेतन

उपक्रमांतर्गत बांधकाम क्षेत्रातील गिलावा काम (प्लास्टरिंग), सिरेमिक फरशी बसविणे (सिरेमिक टायलिंग), इमारतींचे सांगाडे/फ्रेमवर्क तयार करणे आणि लोखंड वाकविणे (आयर्न बेंडिंग) या चार व्यवसायांतील कामगारांची निवड करण्यात आली आहे. या 4 बांधकाम व्यवसायांतील पहिल्या टप्प्यातील 103 कामगारांनी इस्रायली मानकांनुसार प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

त्यापैकी 60 कामगार गुरूवारी इस्रायलला रवाना होतील. तिथे हे कामगार ५ वर्षांसाठी तेल अवीव येथे काम करणार आहेत. त्यांना सुमारे २ लाख रुपये प्रतिमाह वेतन मिळणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

Maharashtra construction workers, CM Devendra Fadnavis
Eknath Shinde news : सुप्रीम कोर्टात पहिल्याच दिवशी वकिलांची सडेतोड मांडणी; सुनावणी संपताच दिल्लीत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, पक्षांतर केलं नाही...

अशी झाली निवड

उपक्रमासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत सुमारे ४ लाख कामगारांची छाननी करण्यात आली. १२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून खुल्या कॅम्पस भरतीद्वारे उमेदवारांपर्यंत पोहोचण्यात आले. तसेच ३ लाखांहून अधिक कामगारांशी दूरध्वनी व लघुसंदेश द्वारे संपर्क साधण्यात आला. त्यानंतर ९९७ उमेदवार निवडले गेले.

Maharashtra construction workers, CM Devendra Fadnavis
Congress politics : राहुल गांधींकडून ओवेसींना पहिला मोठा झटका; बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी आणि इस्रायली नाव पडताळणी प्रक्रियेनंतर ७८३ उमेदवारांना अंतिम मान्यता मिळाली. या उमेदवारांना टप्प्याटप्प्याने इस्रायलमध्ये रोजगारासाठी पाठविण्यात येणार आहे. कामगारांना इस्रायली प्रशिक्षकांनी २२ ते २५ जुलै दरम्यान प्रशिक्षण दिले. त्यानंतर १०३ उमेदवारांनी इस्रायली मानकांनुसार रिफ्रेशर प्रशिक्षण पूर्ण केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com