Maharashtra Assembly Election: मविआ, महायुतीची डोकेदुखी वाढली; शेवटपर्यंत 'हे' बंडखोर उमेदवार नॉट रिचेबलच !

Maharashtra Vidhan Sabha Election: सॊमवारी दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. त्यानंतर राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी व महायुतीने बंडखोरी रोखण्यावर भर दिला होता.
MVA- Mahayuti
MVA - MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सॊमवारी दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. त्यानंतर राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी व महायुतीने बंडखोरी रोखण्यावर भर दिला होता. त्याला काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी बंडखोरांनी माघार घेतली नसल्याने डोकेदुखी वाढणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांसाठीची तयारी जोरात सुरु आहे. सोमवारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने सर्वच पक्षात धावपळ सुरु होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल मागे घेण्याच्या मुदतीत महाविकास आघाडी व महायुतीमधील काही नेते शेवटच्या क्षणापर्यंत नॉट रिचेबल राहिल्याने डोकेदुखी वाढणार आहे.

एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील (MVA) बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असताना ही मंडळी संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहिल्याने अधिकृत उमेदवारासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यातील काही बंडखोर उमेदवार शेवटी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मातब्बर नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने अधिकृत उमेदवारासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार असताना शिवसेनेने राजश्री अहिरराव यांना विमानाने एबी फॉर्म पाठवला होता. तर दिंडोरी मतदारसंघात देखील राष्ट्रवादीचा उमेदवार असताना शिवसेनेने धनराज महाले यांना एबी फॉर्म दिला होता. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र राजश्री अहिरराव नॉट रिचेबल असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.

MVA- Mahayuti
MVA Nagpur : शरद पवारांनी पंढरपूर, हिंगणा घेतले, आता पूर्व नागपूरचे काय होणार?

राष्ट्रवादीच्या (NCP) नरहरी झिरवाळ यांच्यासमोर धनराज महाले यांना ए बी फॉर्म देण्यात आला होता. तर देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांच्यासमोर राजश्री अहिरराव यांना ए बी फॉर्म देण्यात आला होता. त्यामुळे या दोन मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती. धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

राजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बंडखोरी केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन साळवी यांना ही जागा सुटल्याने काँग्रेसने या जागेसाठी आग्रही मागणी केली होती. रत्नागिरी- राजापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे.

MVA- Mahayuti
Nashik Central Assembly: काँग्रेस वसंत गीते यांच्यासोबत, हेमलता पाटील माघार घेणार का?

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि बंडखोर उमेदवार अविनाश लाड नॉट रिचेबल झाले आहेत. अविनाश लाड नॉट रिचेबल झाल्याने राजापूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी कायम आहे. अविनाश लाड हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यास उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन साळवींच्या अडचणी वाढणार आहेत.

हिंगोली मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते रामदास पाटील सुमटाणकर हे नॉट रिचेबल आहेत. भाजपमधून बंडखोरी करत रामदास पाटील यांनी हिंगोली विधासभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यांनी पक्षाचा राजीनामाही दिला आहे. त्यातच आता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रामदास पाटील सुमटानकर नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे आता सर्वच मतदारसंघात बंडखोरी झाल्याने महायुती व महाविकास आघाडीतील अडचणीत वाढ झाली आहे.

MVA- Mahayuti
Rashmi Shukla : मोठी बातमी : पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना पदावरून हटवले; निवडणूक आयोगाकडून झटका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com