Nashik Central Assembly: काँग्रेस वसंत गीते यांच्यासोबत, हेमलता पाटील माघार घेणार का?

Hemlata Patil election decision: नाशिक मध्य मतदार संघातील काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार डॉ हेमलता पाटील यांच्यावर माघारीसाठी दबाव?
Vasant Gite & Dr Hemlata Patil
Vasant Gite & Dr Hemlata PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिक मध्य मतदार संघातील बंडखोरी बाबत आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वसंत गीते यांना पाठिंबा दिला आहे.

नाशिक मध्य मतदार संघ महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला दिला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून माजी आमदार वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार गीते यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर किती ठाम राहतात याबाबत आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीतून माघार घेण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी बंडखोरांची मनधरणी सुरू केली आहे. आज यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत.

Vasant Gite & Dr Hemlata Patil
Narhari Zirwal Politics: सुहास कांदे पाठोपाठ नरहरी झिरवाळ का पोहोचले जरांगे पाटलांच्या भेटीला?... काय आहे प्रकरण?

निवडणुकीचे चित्र उद्या स्पष्ट होईल. नाशिकमध्ये मतदारसंघात काँग्रेस पक्षात पक्षाचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक राहुल दिवे नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार गीते यांना यश आले आहे.

काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शहरात बैठक घेतली. यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार गीते यांच्या प्रचारात सहभागी होण्याचे ठरले. त्यांनी प्रचाराच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या देखील टाकले आहे.

त्यामुळे काँग्रेसच्या बंडखोर डॉ पाटील या आता एकट्या पडल्या आहेत. त्यांच्या मागे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी देखील बंडखोर डॉ पाटील यांच्याशी संपर्क करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे.

Vasant Gite & Dr Hemlata Patil
Eknath Shinde politics: शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या माघारीसाठी अजित पवारांचे प्रयत्न यशस्वी होतील का?

सकल मराठा समाजाकडून नाशिक मध्य मतदारसंघात मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने या समाजाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी देखील हेमलता पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांना माघार घेण्यासाठी विनंती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनीही अपक्ष उमेदवारी केली आहे. सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी विनंती केल्याने श्री ठाकरे आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज नाशिक मध्य मतदारसंघातील राजकीय घडामोडींना विशेष वेग आला आहे.

यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या विरोधातील बहुतांश बंडखोर उमेदवार निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आज काय निर्णय होतो, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com