Ajit Pawar : बजेटचं गणित मांडत अजितदादांनी 'मविआ'च्या 'पंचसूत्री'ची हवाच काढली; म्हणाले 'जादुची कांडी...'

Ajit Pawar Criticized MVA Panchasutri : महायुती सरकारच्या योजना या 75 हजार कोटींपर्यंत आहेत. पण ते योजना तीन लाख कोटीपर्यंत घेऊन गेले आहेत, अशी टीका अजित पवारांनी महाविकास आघाडीवर केली.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : महाविकास आघाडीने पंचसूत्री मांडत महिलांना दरमहा 3 हजार रुपये तर बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या पंचसूत्री खिल्ली उडवत या योजनांची अंमलबजावणी केली तर विकासाला पैसे कुठून आणणार, असा प्रश्न केला.

अजित पवार म्हणाले, बेरोजगारांना चार हजार देणार. महिलांना 300 देणार, कर्जमाफी करणार या सगळ्यांना साधारण लागतायेत तीन लाख कोटी. राज्याचे बजेटच साडेसहा लाख कोटी रुपयांचे आहे.

पुढच्या वर्षी बजेट जाईल सात लाख कोटींवर. बजेटमधील निम्मे पैसे हे जातात पेंन्शन, पगार, घेतलेल्या कर्जाचे व्याजावार आणि निम्मे राहिलेल्या पैशात यांच्या योजना मग डेव्हलपमेंटला कुठून पैसे आणणार? कारण केंद्र सरकार त्यांच्या विचारांचे नाही. उगाच काही तरी सांगायचे पटेल असं सांगायचं, असा टोला अजित पवारांना महाविकास आघाडीला लगावला.

Ajit Pawar
Pravin Darekar Politics: दरेकर यांचा चिमटा, 'राहुल गांधींच्या राज्यघटनेच्या पुस्तकाची पाने कोरी'

आमच्या योजना 75 हजार कोटींपर्यंत

महायुती सरकारच्या योजना या 75 हजार कोटींपर्यंत आहेत. पण ते योजना तीन लाख कोटीपर्यंत घेऊन गेले आहेत. ते आम्हाला देऊ शकत नाही, असे म्हटले होते. पण तुम्ही त्यात दुप्पट वाढ, तिप्पट वाढ करताय. मग हे शक्य आहे. तुम्ही जादुची कांडी फिरवणार आहात काय? हे महाराष्ट्रातील मतदारांची फसवणूक करतायते, असे देखील अजित पवार म्हणाले.

अजित पवार- प्रकाश आंबेडकर भेट

अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. नुकतीच प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांनी आंबेडकरांची भेट घेतली.

Ajit Pawar
Kolhapur Assembly Election : राहुल पाटील सहानुभूतीच्या लाटेवर स्वार, नरकेंना मित्रपक्षाचाच धोका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com