BJP News : रवींद्र चव्हाणांच्या डोक्यात 'प्रभारी' आयडिया; मंत्रि‍पद नाकारलेल्या ज्येष्ठ आमदारालाही हवंय सरचिटणीसपद: दिल्लीतून दोन्हीला 'रेड सिग्नल'

Ravindra Chavan BJP president News : राज्यातील संघटनात्मक निवडणुका वर्षभरापूर्वी पार पडल्या आहेत. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या निवडी पार पडल्या.
Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election News
Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील संघटनात्मक निवडणुका वर्षभरापूर्वी पार पडल्या आहेत. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या निवडी पार पडल्या. बुथप्रमुख, मंडलप्रमुख व जिल्हाध्यक्ष निवडींनंतर रवींद्र चव्हाण यांची आठ महिन्यापूर्वी प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गेली आठ महिने लोटले तरी प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली नसून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळातील कार्यकारिणी कार्यरत आहे.

रवींद्र चव्हाण यांच्या डोक्यात प्रभारी नेमण्याची आयडिया आहे तर दुसरीकडे विदर्भातील एका मंत्रि‍पद नाकारलेल्या ज्येष्ठ आमदाराला राज्य कार्यकारिणीत सरचिटणीसपद हवे आहे. मात्र, दिल्लीतून या दोन्ही मागण्यांना रेड सिग्नल असल्याने नव्या कार्यकारिणीची नियुक्ती रखडली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका डिसेंबर 2024 मध्ये पार पडल्या. त्यानंतर रवींद्र चव्हाण हे प्रदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांची जून 2025 मध्ये पूर्णवेळ अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रदेश भाजपने केंद्रीय भाजपकडे (BJP) नव्या कार्यकारिणीची यादी पाठवली आहे. मात्र, केंद्रीय कार्यकारिणीकडून ही यादी दोनवेळा परत आली आहे. त्यामध्ये त्यांनी काही दुरुस्त्या केल्या आहेत. त्याचा पूर्तता करून अडीच महिने झाले तरी अद्याप कार्यकारिणी जाहीर झालेली नाही.

Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election News
BJP Politics: लहान पद, मोठी मागणी! नगरसेविकेने मंत्र्यांनाही लाजवत कोट्यवधींचा बॉम्ब टाकला! चक्क ३०० कोटींची डिमांड!

प्रभारी नियुक्तीवरून अडचण

गेल्या काही दिवसापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत असल्याने हेही विलंबाचे एक कारण सांगितले जात आहे. त्याशिवाय प्रत्येक विभागानुसार राज्यातील प्रत्येक विभागासाठी एक प्रभारी नेमावा, असा प्रस्ताव प्रदेश भाजपकडून केंद्रीय भाजपकडे पाठविण्यात आलेला होता. मात्र त्याला मान्यता मिळाली नाही. अशस्वरूपाच्या प्रभारी नियुक्तीची तरतूद पक्षाच्या घटनेत करण्यात आलेली नाही, असे कारण सांगितले जात आहे. विभागीय संघटनमंत्री असताना प्रभारी हवेतच कशाला, असा मुद्दाही समोर आला आहे.

Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election News
Shivsena-BSP Alliance : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, अमरावतीच्या राजकारणात ट्विस्ट, शिवसेनेची-बहुजन समाज पक्षासोबत युती!

कार्यकारिणीत विधानसभा सदस्यांना संधी नाही

त्यासोबतच विधानसभेच्या आमदारांना कार्यकारिणीत स्थान नको विधान परिषदेचे सदस्य चालतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या सदस्याकडे मतदारसंघ नसल्यामुळे ते पक्षकार्यसाठी वेळ देऊ शकतात, असे केंद्रीय भाजपचे मत आहे. गेल्या काही दिवसापासून विदर्भातील एका ज्येष्ठ आमदाराची सरचिटणीसपद मिळावे, अशी इच्छा आहे. त्यासाठी रवींद्र चव्हाण प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याचवेळी विधानसभेच्या पदाधिकारी असल्यास त्यांना हे पद देऊ नका, असे केंद्रीय भाजपने बजावले आहे. त्यामुळे चव्हाणांची मोठी अडचण झाली आहे.

Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election News
NCP Shiv Sena Alliance : विनय कोरे यांना बालेकिल्ल्यातच धक्का; महायुतीकडून 'करेक्ट कार्यक्रम', राष्ट्रवादी-शिवसेनेने टाकला डाव...

भाजपमधील संघटन मंत्रिपद पाच वर्षापासून रिक्तच

भाजपमध्ये 'प्रदेश संघटन सरचिटणीस' हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण हे पद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील दुवा म्हणून काम करते. राज्यातील प्रदेश भाजपमध्ये संघटन मंत्रिपद पाच वर्षापासून रिक्तच आहे. कार्यकारिणीत हे सरचिटणीस पद संघ आणि कार्यकारिणीत दुवा साधण्याचे काम करते. मात्र, गेल्या पाच वर्षापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे यावेळेस तरी या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election News
Congress Leader : धक्कादायक! राज्याचे माजी मंत्री वादाच्या भोवऱ्यात; काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com