Devendra Fadnavis : सीएम फडणवीसांची ऐन दिवाळीतच मोठी घोषणा; 5 हजार रुपयांच्या मदतींनंतर आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक दिलासा

Devendra Fadnavis to celebrate Diwali News : राज्यात पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा शेतीत उत्पन्नच न निघाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
devendra fadnavis
devendra fadnavissarkarnma
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने 5 हजार रुपयांची तातडीची मदत केली आहे. राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पाच हजार रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, त्यानंतर आता राज्य सरकारच्या वतीने आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्याची घोषणा फडणवीस यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना केली.

राज्यात पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा शेतीत उत्पन्नच न निघाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात येत्या काळात टंचाईचे संकट असणार आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यामुळेच आता त्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा धावून आले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. आज आणि उद्या राज्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार असल्याचे सीएम फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.