Electricity Bill : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दुहेरी आनंद; कर्जमाफीनंतर आता थकीत वीजबिलांनाही माफी : CM फडणवीस यांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Big Announcement Farmers Electricity Bill : भाजपच्या प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा आज (दि. १५) सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
Devendra Fadnavis electricity bill waiver for farmers
Devendra Fadnavis electricity bill waiver for farmersSarkarnama
Published on
Updated on

Farmer power bill relief Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांची तब्बल 48 हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार असून, साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीतील वीजपंपांची जुनी थकीत वीजबिलेही आता माफ होणार आहेत.

भाजपच्या प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा आज (दि. 15) सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली. यावेळी फडणवीस म्हणाले, "शेतकऱ्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे आणि त्याच कोऱ्या पाटीवर आपल्याला महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिता आला पाहिजे, या एका ध्येयाने हा निर्णय घेतला आहे."

यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने याआधीच शेतीला पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या वीजपंपांचे वीजबिल माफ केले आहे. मात्र, साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीतील वीजजोडण्यांची जुनी थकीत वीजबिले अद्याप कायम आहेत. ती अजूनही प्रत्येकाच्या खात्यावर थकबाकी म्हणून जमा आहेत. त्यामुळे त्या बिलांची कधीही वसुली होऊ शकते.

Devendra Fadnavis electricity bill waiver for farmers
Devendra Fadnavis: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दुबार पेरणीच्या खर्चाबाबत सरकारची मोठी घोषणा : बोगस बियाण्यांनी फटका बसलेल्यांना दिलासा

यामुळे एखादा शेतकरी पुन्हा वीजजोडणी घेण्यासाठी गेला, तर त्याला ती मिळण्यात अडचणी येतात. त्याच्या नावावर थकबाकी आहे का, याची तपासणी केली जाते. यामुळेच आमच्या सरकारने थेट निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे 48 हजार कोटी रुपयांची जुनी थकीत वीजबिले माफ करणार आहोत.

Devendra Fadnavis electricity bill waiver for farmers
Rahul Gandhi vs Devendra Fadnavis : TET परीक्षेवरून राहुल गांधी आक्रमक; महत्वाच्या मागण्या करत थेट CM फडणवीसांना म्हणाले, या तीन गोष्टी आजच..., लगेच पलटवारही

नव्याने इतिहास लिहिता यावा म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांची पाटी कोरी करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. तसेच राज्यातील 76 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात असून, या वर्षाअखेर शेतकऱ्यांना 100 टक्के मोफत दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com