Freedom of Religion Bill : धर्मस्वातंत्र्य विधेयक आज मांडणार, धर्मांतराला बंदी? नेमकं काय आहे विधेयकात?

Maharashtra Freedom of Religion Bill BJP : सक्तीच्या धर्मांतरणा विरोधात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात येणार आहे.
Maharashtra Freedom of Religion Bill
Maharashtra Freedom of Religion Billsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : मंत्रिमंडळाने महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 ला मंजुरी दिली होती. आज हे विधेयक विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांची मंजुरीसाठी हे विधेयक पाठवले जाईल.

राज्यपालांच्या मंजुरीनंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.

सक्तीने, अमिष दाखवून केल्या जाणाऱ्या धर्मांतरणाच्या विरोधात हे विधेयक आणण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये या संदर्भात अभ्यास करून मसुदा तयार करण्यासाठी सरकारने विशेष समिती नेमली होती.

पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीने मसुदा तयार केला. जबरदस्ती किंवा अमिषाने धर्मांतरण करणाऱ्यांना या विधेयकानुसार सात वर्षांची शिक्षा तसेच पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे.

.

Maharashtra Freedom of Religion Bill
Imtiaz Jalil News: इम्तियाज जलील यांचा नवा धमाका; 'रमाई आवास' गैरव्यवहारात थेट भाजप मंत्र्याचेच नाव घेतलं!

..तर संस्थावर बंदी

काही संस्थाच्या माध्यमातून देखील धर्मांतरण करण्यात येत असल्याची काही प्रकरण समोर आली होती. या विधेयकानुसार बेकायदेशीर धर्मांतरासाठी संस्था दोषी अढळली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाईसह बंदीची देखील तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Freedom of Religion Bill
Sagar Moholkar : मोहोळकराच्या शरीरात अजूनही चार बुलेट्स; गोळीबारानंतरचे 10 दिवस, पैलवानच्या प्रकृतीबाबत धक्कादायक अपडेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com