Mahila Bachat Gat: महिला बचत गटांना अडीच एकर जमीन अन् 1 लाखाचे अनुदान मिळणार; सरकारची नवी योजना

Maharashtra Government News Mahila Bachat Gat: महिला बचत गटांना राज्य सरकारकडून अडीच एकर जमीन आणि १ लाख रुपयांचे अनुदान देण्याची मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय.
Mahila Bachat Gat
Mahila Bachat GatSarkarnama
Published on
Updated on

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने नवी योजना जाहीर केली आहे. पात्र महिला बचत गट आणि महिला सहकारी संस्थांना सरकारकडून अडीच एकर सरकारी जमीन लीजवर देण्यात येणार असून व्यवसाय उभारण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेची माहिती दिली.

या योजनेअंतर्गत महिलांना पाच वर्षांसाठी जमीन वापरासाठी दिली जाणार आहे. या जमिनीवर चारा लागवड, नेपियर गवत, बांबू शेती तसेच ग्रासलँड डेव्हलपमेंटसारखे उपक्रम राबवता येणार आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती वाढवणे आणि महिलांचे उत्पन्न वाढवणे हा सरकारचा उद्देश आहे.

महिला बचत गटांना दिल्या जाणाऱ्या १ लाख रुपयांच्या अनुदानासाठी जिल्हा नियोजन समिती (DPC) आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीचा वापर करण्यात येणार आहे. सरकारच्या मते, योग्य पद्धतीने शेती आणि लागवड केल्यास या जमिनीमधून वर्षाला ४ ते ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

Mahila Bachat Gat
PCMC News: PCMC मध्ये गदारोळ! नगरसेवकांचा विरोध डावलून खासगी संस्थेला शैक्षणिक भूखंड

महत्त्वाचे म्हणजे, या जमिनीवरून मिळणाऱ्या उत्पन्नावर संपूर्ण अधिकार संबंधित महिला बचत गटाचा राहणार आहे. सरकार त्यामध्ये कोणताही हिस्सा घेणार नाही. मात्र, जमीन कायमस्वरूपी मालकीने न देता लीज पद्धतीने वापरासाठी दिली जाईल.

Mahila Bachat Gat
Teacher Recruitment: शिक्षक भरतीबाबत सरकारचा मोठा निर्णय! पवित्र पोर्टलला मुदतवाढ; 30 जूनपर्यंत संधी

राज्यात महसूल विभागाच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर पडीक सरकारी जमिनी आहेत. या जमिनींवर अनेकदा अतिक्रमण होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा जमिनी महिलांच्या वापरात आणल्यास अतिक्रमणांनाही आळा बसेल, असा सरकारचा दावा आहे.

योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कृषी विभागाची मदत घेतली जाणार आहे. कृषी तज्ज्ञांकडून महिलांना लागवड, उत्पादन व्यवस्थापन आणि बाजारपेठेचे मार्गदर्शन दिले जाईल. संपूर्ण योजनेची अंमलबजावणी स्थानिक तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे.

Mahila Bachat Gat
Three Language Formula: शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! यंदा त्रिभाषा सूत्र लागू नाही

महत्त्वाचे मुद्दे

* महिला बचत गटांना अडीच एकर सरकारी जमीन

* पाच वर्षांसाठी लीजवर जमीन उपलब्ध

* व्यवसायासाठी १ लाख रुपयांचे अनुदान

* चारा, बांबू, नेपियर गवत लागवडीला प्रोत्साहन

* वार्षिक ४ ते ५ लाख उत्पन्नाचा सरकारचा दावा

* जमिनीवरील नफ्यावर पूर्ण अधिकार बचत गटांचा

* पडीक सरकारी जमिनींचा उपयोग आणि अतिक्रमणांना आळा

* कृषी विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com