PCMC News: PCMC मध्ये गदारोळ! नगरसेवकांचा विरोध डावलून खासगी संस्थेला शैक्षणिक भूखंड

Pimpri Chinchwad News Educational Land Controversy: पुनावळे येथील कोट्यवधींचा शैक्षणिक भूखंड खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवकांच्या विरोधानंतरही पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंजूर केला.
PCMC News
PCMC NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुनावळे परिसरातील कोट्यवधी रुपयांचा शैक्षणिक भूखंड खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, स्थानिक नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवूनही सत्ताधारी भाजपने हा विषय मंजूर केला.

पुनावळे येथील आरक्षण क्रमांक ४/५७ अंतर्गत सुमारे १.८० हेक्टर जागा माध्यमिक शाळेसाठी राखीव आहे. त्यापैकी ०.९१ हेक्टर भूखंड महापालिकेच्या ताब्यात असून तो ३० वर्षांच्या कराराने देण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. या प्रक्रियेत ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशनची सात कोटी रुपयांची सर्वाधिक निविदा पात्र ठरली. महापालिकेने निश्चित केलेला मूळ दर पाच कोटी ७४ लाख रुपये होता.

PCMC News
Teacher Recruitment: शिक्षक भरतीबाबत सरकारचा मोठा निर्णय! पवित्र पोर्टलला मुदतवाढ; 30 जूनपर्यंत संधी

स्थायी समितीकडून हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. मात्र, पुनावळे प्रभागाचे नगरसेवक राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर आणि नगरसेविका रेश्मा भुजबळ यांनी या निर्णयाला विरोध केला. स्थानिक नागरिकांसाठी महापालिकेने स्वतः शाळा किंवा क्रीडांगण उभारावे, अशी मागणी त्यांनी केली.

PCMC News
Three Language Formula: शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! यंदा त्रिभाषा सूत्र लागू नाही

सभागृहातील चर्चेदरम्यान नगरसेवकांनी प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची मागणी केली. तसेच एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याची अट घालावी, अशी सूचनाही मांडण्यात आली. मात्र, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी शहरात दर्जेदार शाळांची गरज असल्याचे सांगत प्रस्ताव मंजूर करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी विषय मंजूर झाल्याचे जाहीर केले.

यानंतर विरोध करणाऱ्या नगरसेवकांनी उपसूचना सादर करत शाळेत ४० टक्के प्रवेश महापालिका कर्मचारी आणि एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली. तसेच प्रवेश प्रक्रिया शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) राबवावी, अशी अटही त्यांनी मांडली.

भूमी जिंदगी विभागाचे उपायुक्त सीताराम बहुरे यांनी निविदा प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या या भूखंडासाठी प्राप्त झालेल्या निविदांमध्ये संबंधित संस्थेची सात कोटी रुपयांची निविदा सर्वाधिक होती.

दरम्यान, या निर्णयामुळे पुनावळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून, शैक्षणिक आरक्षणाच्या जागा खासगी संस्थांना देण्याच्या निर्णयावरून स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com