

Nagpur News : राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागासाठी 23 ऑक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता राज्यातील नेतेमंडळी उतरली आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आले आहेत. छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधील महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचाराबाबत शिवसेनेच्या दोन आमदारांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. यावर प्रसार माध्यमाशी बोलताना सीएम फडणवीसांनी मोठे विधान केले आहे.
येत्या काळात होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती भक्कम असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपूर पदवीधर मतदारसंघात सुधाकर कोहळे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार करण्यासाठी मी आलोय. शिक्षक, प्राध्यापक मंच आहे, त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम झाला. त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
अमरावतीत किरण सरनाईक आमचे महायुतीचे उमेदवार आहेत. भाजपं पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव महायुतीच्या उमेदवार आहेत. महायुती त्यांच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं काही भागात प्राब्लय चांगलं आहे. तिथे सुनेत्रा वहिनींनी बैठक घेतली. कामाला लागायला सांगितलं. शिवसेना काम करतेय” असं फडणवीस म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांच्यासाठी शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट प्रचार करत आहेत. या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अपेक्षा व्यक्त केली. “मला असं वाटतं की, मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितलय की, आम्ही महायुती सतीश चव्हाण यांच्यासोबत आहे. भाजप (BJP) कामाला लागली आहे, एखाद्या व्यक्तीने वेगळी भूमिका घेतली म्हणून ती पक्षाची भूमिका मानली जात नाही. माझी अशी अपेक्षा आहे की, त्यांच्या पक्ष नेतृत्वानी याची दखल घेऊन समज द्यावी. जर, सगळे एकत्रित असताना अशी वेगवेगळी भूमिका घेणे पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही,” असेही फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या दोन आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिका
सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन आमदारांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा दिला आहेत तर अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पक्ष प्रमुखांनी दखल घेऊन समज द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.