Maharashtra Assembly: विरोधकांच्या वादळी लक्षवेधीने सभागृह हादरले; कामकाज ठप्प! विधानसभेत पावसावरून तांडव! नेमकं काय घडलं?

Monsoon Session News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत याविषयी चर्चा करण्याची मागणी केली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुण्यातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे मुंबई-पुणे महामार्ग व रेल्वेमार्ग बंद पडला आहे. तर पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने विधानसभेत पावसाच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत याविषयी चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, यावेळी चर्चेच्या मुद्द्यावरून सभागृहात सत्तधारी-विरोधक आक्रमक झाले. गदारोळ केला जात असल्याने सभागृहाचे कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने या गंभीर परिस्थितीवर सभागृहात चर्चा करावी, यासाठी सत्ताधारी मंडळी आक्रमक झाली होती. राज्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पूरपरिस्थितीमुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. त्यांना त्रास होत असल्याचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी स्पष्ट करीत याविषयावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली.

Uddhav Thackeray
Maharashtra News Update: दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील पूरस्थितीची राज्य सरकारला काळजी नाही, असा आरोप यावेळी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केला. तर याविषयावर चर्चा करण्याची मागणी केली जात असताना राज्य सरकार चर्चेला तयार नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला. यावेळी सभागृहात याच मुद्दयावरून सत्ताधारी व विरोधकानी गदारोळ केला.

Uddhav Thackeray
ZP News : झेडपी सीईओच्या बंगल्यात 25 लाखांचे बोगस काम दाखवून बील लाटले; आणखी 23 कामे संशयाच्या फेऱ्यात, कोट्यावधींचा घोळ उघडकीस येणार!

यावेळी याच मुद्द्यवरून सत्ताधारी व विरोधकानी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर उद्या पावसाच्या नुकसानीबाबत चर्चा करू, असे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. त्यानंतर सभागृहातील गदारोळ थांबला.

Uddhav Thackeray
Maharashtra News Live Update : केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, ओम राजेनिंबाळकर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com