Vidhan Parishad Mahayuti Candidates List : विधानपरिषदेसाठी 17 मतदारसंघ अन् महायुतीचे 18 उमेदवार : पाहा कोणाकडून, कोणाला, कुठे संधी

Mahayuti Fields 18 Candidates for 17 Constituencies Full List : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी 17 मतदारसंघांवर महायुतीने 18 उमेदवारांना संधी दिली आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळाली, याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Mahayuti Government
Mahayuti GovernmentSarkarnama
Published on
Updated on

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठीची राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. आज, (१ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असतानाच महायुतीचे जागावाटप आणि अंतिम उमेदवार अधिकृतपणे समोर आले आहेत. प्रचंड रस्सीखेच आणि दावे-प्रतिदाव्यानंतर महायुतीमध्ये ११-४-२ असा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला असून त्यानुसार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

महायुतीचे अंतिम जागावाटप (एकूण १७ जागा)

  • भारतीय जनता पक्ष : ११ जागा

  • शिवसेना : ०४ जागा

  • राष्ट्रवादी काँग्रेस : ०२ जागा

Mahayuti Government
New rules From June 1st : आजपासून लागू झाले नवे नियम 'या' 7 मोठ्या बदलांमुळे सर्वसामान्यांवर वाढणार आर्थिक ताण?

प्रमुख पक्षांची अंतिम उमेदवार यादी

१. भारतीय जनता पक्ष (११ जागा)

भाजपने आपल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण बदल्या पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, ११ पैकी ६ जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना पार्श्वभूमी असलेल्या 'आयात' नेत्यांची वर्णी लागली आहे.

भाजप

  1. जळगाव : नंदकिशोर महाजन

  2. संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट

  3. धाराशिव-बीड-लातूर : बसवराज पाटील

  4. नांदेड : अमरनाथ राजूरकर

  5. अमरावती : प्रवीण पोटे पाटील

  6. नागपूर : राजीव पोतदार

  7. भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर

  8. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखाणी

  9. अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे

  10. सोलापूर : राजेंद्र राऊत

  11. सातारा-सांगली : धैर्यशील कदम

शिवसेना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत 'स्मार्ट खेळी' करत आपल्या चार जागांवर अंतिम उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अल्पसंख्यांक कार्ड खेळत सर्वांना चकित केले आहे:

  1. ठाणे : रवींद्र फाटक

  2. नाशिक : नरेंद्र दराडे

  3. परभणी-हिंगोली : सईद खान

  4. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी

Mahayuti Government
Balasaheb Thorat : 'काही तासांत चित्र स्पष्ट होईल'; मविआच्या उमेदवारीवर बाळासाहेब थोरातांचे सूचक वक्तव्य, सस्पेन्स वाढला

राष्ट्रवादी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) या दोन जागा आल्या आहेत.

  1. पुणे : विक्रम काकडे

  2. कोकण : अनिकेत तटकरे

निवडणुकीचा पुढील कार्यक्रम

  • १ जून २०२६: उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस

  • २ जून २०२६: अर्जांची छाननी (Scrutiny)

  • ४ जून २०२६: अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस (या दिवशी अधिकृतपणे चित्र स्पष्ट होईल की निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार)

  • १८ जून २०२६: सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान

  • २२ जून २०२६: मतमोजणी आणि निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका) निवडणुका पार पडल्यानंतर होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com