Legislative Council Election : राज्यसभेप्रमाणे एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार, विधान परिषदेसाठी 'ही' पाच नावं चर्चेत

Eknath Shinde Shital Mhatre Sanjay Mandlik : विधान परिषदेच्या दोन जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे ते कोणाला संधी देतात याची चर्चा सुरू झाली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Politics : राज्यसभेसा निवडणुकीसाठी विविध नेत्यांची नावांची चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघामारे यांना उमेदवारी दिली. प्रस्थापित नेत्यांपेक्षा सर्वसामान्य नेत्याला उमेदवारी देणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेंचे कौतुक देखील झाले. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. त्यासाठी शिंदे कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यसभा हुकलेल्या आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांकडून विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्ष वाढीसाठी शिंदेसाहेब मला संधी देतील, असे दावे देखील काही नेते खासगीत करत करत आहेत. दरम्यान, पाच नेत्यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर आहे.

राज्यसभेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या शायना एनसी आणि शितल म्हात्रे यांचे नाव विधान परिषदेसाठी आघाडीवर आहे. तसेच माजी खासदार आनंदराव अडसुळ यांचे पुत्र अभिजित अडसुळ यांना देखील संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. तर, कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा आहे. तर, उत्तर महाराष्ट्रातून भाऊसाहेब चौधरी यांचे नाव आघाडीवर आहे.

Eknath Shinde
Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांचा 'मास्टरस्ट्रोक'! एका जागेसाठी 'या' नावांची जोरदार चर्चा; राष्ट्रवादीतून कोणाला आमदारकीची लॉटरी?

निलम गोऱ्हेंना पुन्हा संधी?

विधान परिषदेमध्ये पुन्हा संधी मिळावी आणि उपसभापतीपद कायम राहवे म्हणून निलम गोऱ्हे इच्छुक आहेत. पक्षाला दोन जागा विधान परिषदेमध्ये मिळत असताना निलम गोऱ्हे यांना शिंदे पुन्हा संधी देणार की नवीन चेहऱ्याला उमेदवारी मिळणारी याची देखील उत्सुकता शिवसैनिकांमध्ये आहे.

Eknath Shinde
Legislative Council Election : देवेंद्र फडणवीसांचे धक्कातंत्र, मोहिते पाटील, केचेंचा पत्ता कट? विधान परिषदसाठी 'या' नेत्यांची नावे चर्चेत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com