Firecracker Ban Maharashtra : महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी वर्षभर फटाकेबंदी; उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, दिवाळीसह सर्व उत्सवांना नियम लागू

Maharashtra Bombay High Court Bans Firecrackers on Public Places Throughout the Year : महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची चर्चा आहे. दिवाळीसह सण-उत्सवांमध्ये फटाके फोडण्यासंदर्भातील निर्बंध, नियम आणि निर्णयाचे महत्त्व जाणून घ्या.
Firecracker Ban Maharashtra
High Court order on firecrackers in public placesSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर फटाके फोडण्यास वर्षभर बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण आदेशामुळे दिवाळीसह राज्यातील सर्व सण आणि उत्सवांमध्ये सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर निर्बंध असतील. ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

गणेशोत्सव, दिवाळी आणि अन्य सणांच्या काळात होणारे ध्वनी व वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. गणेशोत्सवात डीजे, लाउडस्पीकर आणि ढोल-ताशांच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होते, तर दिवाळीत फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता खालावते. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने या समस्येची स्वतःहून दखल घेतली होती. न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

Firecracker Ban Maharashtra
BJP controversy : ...तर भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील! भाजपच्या बड्या नेत्याचे धक्कादायक विधान, व्हिडिओ व्हायरल, विरोधक तुटून पडले

'दी असोसिएशन ऑफ फायरवर्क्स ट्रेडर्स' या संघटनेने 22 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशाबाबत स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यांवरील फटाकेबंदी ही केवळ दिवाळीपुरती मर्यादित नसून वर्षभरातील सर्व सण-उत्सवांसाठी लागू असल्याचे स्पष्ट केले. या आदेशासंदर्भात सविस्तर नियमावली आठवडाभरात प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि समाजमाध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी प्रभागस्तरावर सूचना प्रसिद्ध कराव्यात, तसेच जनजागृती मोहिमेसाठी सेलिब्रिटींची मदत घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायालयाने स्पष्ट केले की, सण-उत्सव साजरे करण्यास आक्षेप नाही; मात्र त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होता कामा नये. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाची समस्या गंभीर असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

Firecracker Ban Maharashtra
FDA News: धक्कादायक; एकीकडे अमेरिकेपर्यंत गाजावाजा, दुसरीकडे मंत्र्यांच्या जिल्ह्यातच भेसळखोरांना संरक्षण?

दरम्यान, या आदेशामुळे फटाक्यांची निर्मिती किंवा विक्री यांवर बंदी घालण्यात आलेली नाही. फटाके उद्योगावर अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचे न्यायालयाने नमूद केले. नागरिकांनी हरित फटाक्यांचा वापर आणि पर्यावरणपूरक दिवाळीबाबत जागरूक व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी कशी होते आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरील निर्बंधांचे पालन कितपत केले जाते, याकडे आता राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com