FDA News: धक्कादायक; एकीकडे अमेरिकेपर्यंत गाजावाजा, दुसरीकडे मंत्र्यांच्या जिल्ह्यातच भेसळखोरांना संरक्षण?

FDA enforcement and food safety Maharashtra : महाराष्ट्रातील अन्नभेसळीच्या मुद्द्यावरून FDA च्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मंत्र्यांच्या जिल्ह्यात भेसळखोरांना संरक्षण मिळत असल्याच्या आरोपांमागील नेमके प्रकरण जाणून घ्या.
Maharashtra FDA Action
Maharashtra FDA Action sarkarnama
Published on: 
Updated on: 

Bhausaheb Bairagi news: अन्न व औषध प्रशासन आयुक्तांच्या कारवाईची थेट अमेरिकेपर्यंत चर्चा आहे. मात्र या खात्याचे मंत्री नरहरी शिरवळ यांच्या जिल्ह्यातच दूध भेसळखोरांना मिळणारे राजकीय संरक्षण वादाचा विषय बनले आहे. दूध भेसळ संस्थांवर छापे टाकू नये कारवाई नसल्याची चर्चा जोरात आहे.

सिन्नर तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन महिन्यांपूर्वी मोठी कारवाई केली. यामध्ये रामपूर सह तीन दूध संकलन संस्थांवर छापे टाकण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणावर भेसळीचे साहित्य आणि खवा जप्त करण्यात आला.

Maharashtra FDA Action
Nashik Crime : नाशिक हादरलं ! सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन ; जावयाने केला धक्कादायक दावा

या संदर्भात पथकाने केलेल्या कारवाईत चक्क संशयित आरोपीच सोबत फिरत असल्याची तक्रार आहे. या छाप्यांमध्ये तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत १७.३० लाखांचे आठ हजार ३१२ किलो भेसळीसाठी वापरण्यात येणारे रसायन जप्त करण्यात आले. यासंदर्भात वावी आणि मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईनंतर मुख्य संशयित तसेच दूध संस्थांचे संचालक अलिप्त राहिले. या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर लष्कराला तसेच अन्यत्र दुधाचा पुरवठा केला जातो.या कारवाईनंतर अचानक तालुक्यातील दुधाचे संकलन मोठ्या प्रमाणावर घटले. त्यातूनही भेसळीवर शिक्कामोर्तब झाले होते.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी पाठपुरावा केला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. नंतरही प्रशासनातील पाच स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात असूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही.

Maharashtra FDA Action
Sinhasth Kumbhmela : कामाची घाई, नीधीला मात्र नाही; कुंभमेळ्याचा कंट्रकदाऱ्यांमध्ये बिलांची भीती?

तालुक्यात दूध संस्थांची राजकीय नेत्यांचा थेट संबंध आहे, अशी चर्चा आहे. माजी मंत्र्यांचा तालुका तसेच थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा जिल्हा असूनही पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावरही भेसळीची कारवाई झाली नाही. या विभागाची कठोर कारवाई म्हणून अमेरिकेपर्यंत चर्चा झाली. मात्र मंत्र्यांच्याच जिल्ह्यात भेसळ करणाऱ्यांना संरक्षण असल्याची चर्चा आहे. याबाबत कारवाई व्हावी यासाठी भाऊसाहेब बैरागी यांनी पांगरी येथील हरीबाबा मंदिरात उपोषण सुरू केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com