

Mumbai News : राज्यात एकीकडे विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी 8 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा असल्याने या जागेवर उमेदवार कोण असणार? याची चर्चा रंगली आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे एकीकडे नवनीत राणा राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा सुरु असताना या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्टीकरण बड्या नेत्याने प्रसार माध्यमाशी बोलताना दिले.
राज्यातील राज्यसभेची एक जागा रिक्त असून विधानसभा आमदारातून निवडून द्यावयाच्या या एका जागेसाठी 18 जूनला निवडणूक होत आहे. बारामती विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या एकमेव जागेसाठी राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या जादा असल्याने त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्यसभेच्या या जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा इच्छुक आहेत. त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी भेट घेऊन या जागेसाठी लॉबिंग सुरु केले आहे. ही जागा आदरणीय सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणारी जागा आहे, त्यामुळे तिथे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. याबाबत लवकरच राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होईल. त्यानंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी भेटत असतात. त्यामुळे कुणी भेटले की अशा चर्चा होत राहतात. प्रत्येक वेळी प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही. विधानपरिषद निवडणुकीसाठी जी रणनिती पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी आखली ती तंतोतंत यशस्वी झाली. आमच्या दोन्ही जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, असेही उमेश पाटील म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी आम्हाला दुपट्टीहून अधिक मतदान होणार होते. विरोधी उमेदवार जिंकून येण्याची शक्यता नसल्याने त्यांनी अर्ज मागे घेतले. त्यांचे स्वागत व्हायला पाहिजे. तो त्यांचा विषय आहे. श्रीकांत पाटील हे तीस चाळीस मतांवर कसे निवडणूक लढणार होते. तश्या परिस्थितीत अपमानास्पद पराभव होण्यापेक्षा त्यांनी सन्मानाने अर्ज मागे घेतला. उलट चांगले झाले आहे, असेही उमेश पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.