

Mumbai News : आगामी काळात राज्यात होत असलेल्या राज्यसभेच्या सहा जागेंच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सहा जागेसाठी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. त्यातच आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी खेळी केली आहे. राज्यसभा निवडणुका बिनविरोध होताच विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची जागा रिक्त आहे. मे महिन्यात विधानपरिषदेतील 9 जागा रिक्त होणार आहेत. त्यानंतर विधानपरिषदेतील चित्र बदलणार आहे. त्यामुळे भाजपने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी मोठा डाव टाकल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याचे नाव निश्चित झाल्याचे समजते.
राज्यातील विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतरही विधान सभेतील विरोधी पक्षनेता निवडला नाही. महाविकास आघाडीतील कुठल्याच पक्षाकडे दहा टक्के संख्याबळ नसल्याचा दावा करीत हे पद रिक्त ठेवले आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची सहा वर्षाची कारकीर्द पूर्ण झाल्याने ऑगस्ट महिन्यात ते निवृत्त झाले आहेत. त्यानंतर दोन अधिवेशन पार पडली तरीही हे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे.
विधानपरिषदेतील 9 सदस्यांची मुदत मे महिन्यात संपणार आहे. या रिक्त होत असलेल्या 9 जागा भरल्यानंतर विधान परिषदेतील संख्याबळ बदलणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात होत असलेली राज्यसभा निवडणूक बिनविरोध होताच विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता अधिक आहे.
भाजपने (BJP) विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात मोठा दावा टाकला आहे. विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात 9 विधान परिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत. त्यामध्ये भाजपच्या 4, एकनाथ शिंदे शिवसेना, काँग्रेस, अजित पवार एनसीपी, एनसीपी शप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. या निवडणुकीत विधान परिषदेसाठी 29 मतांचा कोटा असणार आहे. त्यानुसार अशात, महायुतीच्या वाट्याला 8 जागा येणार, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे.
महायुतीच्या वाट्याला येत असलेल्या 8 जागामध्ये भाजप 5, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 2 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटयाला एक जागा येणार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीतील या एक जागेसाठी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस असणार आहे. ही एकमेव जागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असल्याने त्यांचा दावा असणार आहे.
काँग्रेसच्या सतेज पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता
सध्य परिस्थितीत विधान परिषदेत काँग्रेसचे 6, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे 3 जागा आहेत. त्यामुळे या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला तर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला असे ठरले आहे. त्यामुळे या पदावर आता काँग्रेसच्या सतेज पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.