New Delhi : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील हे आज महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याआधीच एक दिलासादायक बातमी आली आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यावर 24 जानेवारी 2024 रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.
क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेणाऱ्यांपैकी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांचा निवृत्तीपूर्वी कामकाजाचा 15 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. त्यांनी त्यापूर्वीच याचिका स्वीकारण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे. क्युरेटिव्ह पिटीशनवर सर्वोच्च न्यायालयात आता 24 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे, अशी माहिती विनोद पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षण वैध की अवैध, यावर क्युरेटिव्ह याचिका दाखल केली गेली आहे. जयश्री पाटील यांनी आरक्षणाला विरोध केला होता. तर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका याचिका दाखल केली आहे. (Maratha Reservation) न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारल्यामुळे खुल्या कोर्टात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
(Edited By – Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.