Maharashtra News: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची आणखी एक मोठी घोषणा; सहा जिल्ह्यांमध्ये नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन होणार

New Additional Tehsildar Offices: महायुती सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहे.त्यांनी महसूल यंत्रणेत शिस्तबद्ध व पारदर्शी कारभारासह शेतकरी,सर्वसामान्य नागरिकांना वर्षानुवर्षे होणारा मनस्ताप कमी करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत.
chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankuleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: महायुती सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहे.त्यांनी महसूल यंत्रणेत शिस्तबद्ध व पारदर्शी कारभारासह शेतकरी,सर्वसामान्य नागरिकांना वर्षानुवर्षे होणारा मनस्ताप कमी करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली आहेत. अशातच आता राज्यातील नागरिकांची महसूलविषयक कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने 9 नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर आणि नाशिक विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. यात चिंचोली खापरखेडा, घोट, सिन्नर, शिरपूर शहर, शहादा, जळगाव शहर, चाळीसगाव आणि पहूर या ठिकाणी नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. याविषयी शासन निर्णय 23 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे संबंधित भागातील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा दूरवरच्या कार्यालयांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे.

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार, सहा जिल्ह्यांमध्ये नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यात आल्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर महसूल प्रशासनाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

chandrashekhar bawankule
Satara Politic's : चार पैसे दिल्याने कोणी नेता होत नाही; नको त्या माणसाच्या नादाला लागू नका : जयकुमार गोरेंच्या पत्नीची टीका कोणावर?

यात आता नवीन अपर तहसीलदार कार्यालयांमुळे नागरिकांना जमीनविषयक कागदपत्रे, फेरफार नोंदी, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आणि इतर महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्चही वाचण्यास मदत होणार आहे.

तर दुसरीकडे मूळ तहसीलदार कार्यालयात निवडणूकविषयक कामे, संजय गांधी निराधार योजना आणि इतर बिगर-महसुली कामे पूर्वीप्रमाणेच मूळ तहसीलदार कार्यालयामार्फतच चालणार आहे.

chandrashekhar bawankule
Anganwadi News: मोठी बातमी: राज्यातील अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’: 3 हजार 832 केंद्रांची निवड; महिला व बालकल्याण विभागाची मान्यता

मात्र, दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि दळणवळणाच्या सोयी, अंतर लक्षात घेता प्रशासकीय विकेंद्रीकरण झाल्यामुळे मूळ तहसील कार्यालयांवरील ताण कमी होऊन संबंधित कामांचा लवकरात लवकर निपटारा लागण्यास मदत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.