Mahayuti election strategy: मोठी बातमी : 'स्थानिक'साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबईत एकजूट, इतरत्र थेट मैत्रीपूर्ण मुकाबला, काय आहे नेमके प्लॅनिंग !

Mahayuti alliance formula News : काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरु केल्याची माहिती असतानाच आता महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.
Mahayuti Politics
Mahayuti PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षात निवडणुकीची लगबग सुरु आहे. एकीकडे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरु केल्याची माहिती असतानाच आता महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याचे समजते.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी एकत्र युती करुन निवडणूक लढवणार आहे. मात्र, ठाणे, पुणे, पिंपरी चिचंवडसह अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील. मात्र, या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील, अशी स्टॅटर्जी महायुतीने स्थानिकच्या निवडणुकीसाठी आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अशी रणनीती ठरल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Mahayuti Politics
Shivsena Politic's : नगराध्यक्षपदावर शिवसेनेच्याच अनेकांचा डोळा, मंत्री उदय सामंत यांच्या भावाची लागणार कसोटी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढल्यास मविआला व अन्य विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो. यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ठाणे, पुणे, पिंपरी चिचंवडसह अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील. या ठिकाणी महायुतीमधील पक्ष वेगवेगळे निवडणुका लढून निकालानंतर पुन्हा एकत्र येणार आहेत.

Mahayuti Politics
BJP Politics : भाजपचे आमदार जीवाच्या आकांताने पक्षात हवा भरतायत... शिंदे-अजितदादा हळूच टाचणी लावतायत

मुंबईत महायुती एकत्र लढेल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र आले आहेत. या दोघांचे आव्हान महायुतीसमोर असणार आहे. त्यामुळेच महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. तर उर्वरित ठिकाणी रणनीती आखून एकत्र लढायचे की वेगवेगळे लढायचे हे आम्ही ठरवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Mahayuti Politics
Congress Protest : महायुती सरकारचा धिक्कार करणार ; कॉंग्रेस नेते खाणार शेतकऱ्यांसोबत 'पिठलं भाकरी' अन् ठेचा..

ठाणे महानगरपालिकेचा विचार करता 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते. यामध्ये शिवसेनेला (Shivsena) स्पष्ट बहुमत मिळाले होते. शिवसेनेचे 67 नगरसेवक निवडून आले होते. तर भाजपचे फक्त 23 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे येत्या काळात ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यास स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Mahayuti Politics
BJP vs Congress Bihar election : बिहारचं मैदान मोदी अन् राहुल कसं गाजवणार? कसं ठरलं सभाचं नियोजन...

याठिकाणी होणार मैत्रीपूर्ण लढत

ठाणे महापलिका निवडणुकीत भाजपचे आमदार संजय केळकर, मंत्री गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंची कोंडी करताना दिसत आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजप व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यांची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. तर दुसरीकडे पुण्यात भाजप व एकनाथ शिंदेची शिवसेना यांची युती होऊ शकत्र याठिकाणी त्यांची अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

Mahayuti Politics
Shiv sena-BJP News :भाजपला अर्जुन खोतकर यांचा कडक इशारा; 'स्वबळाची खाज असेल तर मिटवून टाकू'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com