
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे. सर्वांनाच मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता लागली असताना आता तारीख निश्चित करण्यात आली आहे. चार दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवडही झाली. त्यानंतर महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खातेवाटप, कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याचा फॉर्म्युला ठरला नसल्याने विस्ताराला उशीर लागत होता. (Mahayuti Cabinet Expansaion News )
महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षाचे खातेवाटप व मंत्रीपदाचा फॉर्म्युला फायनल झाल्याने मंत्रिमंडळाचा शपथविधी 15 डिसेंबरला दुपारी 4 वाजता होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. आता या मंत्रिमंडळात गेल्या दहा वर्षांत संधी न मिळालेल्या भाजपमधील (Bjp) चेहऱ्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याने सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आता जुन्या मंत्र्यांना हटवून नवे चेहरे आणण्याची रणनीती सुरू आहे. यातच अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट करून नव्यांना संधी देणार असल्याचे समजते. विशेषतः एकनाथ शिंदे यांनी चार बड्या नेत्यांना वगळण्याचा निर्णय घेतला असल्याचा समजतो. त्यामुळे मोठ्या संख्येने शिवसेनेत नव्या चेहऱ्याना संधी मिळण्याची शक्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ करीत मोठे यश मिळवले. 288 जागांपैकी 230 जागावर महायुतीने विजय मिळवला. मंत्रिमंडळ विअस्तरात भाजपचे 21 मंत्री असणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १० आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय गेल्या टर्ममध्ये असलेली खाते प्रत्येकाकडे असणार असल्याचे समजते. गृहमंत्रालयावरून सुरु असलेला वाद मिटला असल्याचा समजतो.
याबाबत नवी दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. यानंतर नवीन मंत्र्यांच्या शपथविधीची तारीख 15 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्याआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.