Mahayuti tensions : महायुतीत ऑल इज नॉट वेल? MMRDAच्या लोकापर्ण सोहळ्याकडे एकनाथ शिंदेंची पाठ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

MMRDA inauguration news : महायुतीमधील तीन मित्रपक्षात ऑल इज नॉट वेल? असेच दिसत आहे. MMRDAच्या लोकापर्ण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दांडी मारली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
eknath shinde Devendra Fadnavis
Jalgaon MLC Election | BJP vs Shinde Sena ClashSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत गेल्या आठवडाभरापासून सुनावणी सुरू आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमकपणे युक्तीवाद केला. त्यामुळे एकीकडे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. त्यातच महायुतीमधील तीन मित्रपक्षात ऑल इज नॉट वेल? असेच दिसत आहे. MMRDAच्या लोकापर्ण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दांडी मारली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीमधील तीनही मित्रपक्षात गेल्या काही दिवसापासून वाद निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, महायुतीमधील अंतर्गत वाद हा आतापर्यंत चव्हाट्यावर आला नव्हता. मात्र, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा (MMRDA) कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुतीमधील वाद पहिल्यादांच चव्हाटयावर आला आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन गुरुवारी पार पडले. मात्र, या शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव असूनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक गैरहजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

eknath shinde Devendra Fadnavis
Maharashtra Budget 2026 Live Update : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका, म्हणाले,'चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना....'

एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये नगरविकास खाते सांभाळतात. विशेष म्हणजे ते एमएमआरडीएचे अध्यक्षही आहेत. त्यानंतरही शिंदे यांनी या महत्त्वाच्या कार्यक्रमाला गैरहजेर राहिल्याने अनेक तर्क-वितर्कांना वाव मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत दौऱ्यांच्या आणि कार्यक्रमांच्या यादीत एमएमआरडीएच्या या सोहळ्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. तरीही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

eknath shinde Devendra Fadnavis
Maharashtra Assembly : वेगवान घडामोडींनी राजकारण तापलं! अध्यक्षांच्या दालनात सीएम फडणवीसांसह तीन बड्या नेत्यांमध्ये खलबतं, विरोधकांचे धाबे दणाणले!

एमएमआरडीएच्या या विशेष कार्यक्रमात चार महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामध्ये या दोघांमध्ये विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे यांनी कार्यक्रमाला दांडी मारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com