Mahayuti alliance conflict : महायुतीमध्ये ठिणगी! एकनाथ शिदेंच्या शिवसेनेला डावलले...; बड्या महिला नेत्याचा आरोप

BJP and Eknath Shinde Shiv Sena latest dispute News : महायुतीमध्ये भाजपकडून बरोबरीची वागणूक मिळत नाही, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी केला.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : महायुतीच्या मित्रपक्षात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेला अंतर्गत वाद मिटण्याचे नाव घेत नाही. सरकार स्थापनेपासूनच भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील वाद वाढतच आहे. दोन्ही पक्षात या-ना त्या कारणावरून मतभेद असल्याचे पुढे आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर एकमेकांवर पराभवाचे खापर फोडले जात असतानाच आता शिवसेनेतील बड्या महिला नेत्याने एकनाथ शिदेंच्या शिवसेनेला डावलले जात असल्याचा खळबळजनकी आरोप केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच या महिला नेत्याने भाजपसोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

महायुतीमध्ये भाजपकडून (BJP) बरोबरीची वागणूक मिळत नाही, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी केला त्यांनी या संदर्भातली आपली नाराजी एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे. शिवसेनेच्या बड्या महिला नेत्या शायना एनसी यांनी देखील आपल्या मनातली नाराजी बोलून दाखवली. “शासन, प्रशासन, माजी खासदार आणि सध्याचे राज्यसभेचे खासदार यांना कार्यक्रमात डावलतात. हे योग्य नाही. आम्ही सगळ्यांचा सन्मान करतो, पण ते आमचा करत नाहीत हे योग्य नाही” असा आरोप शायना एनसी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केला आहे.

महायुतीमध्ये विशेषतः शिवसेनेची गळचेपी सुरूच आहे. गेल्या वर्षभरात भाजपकडून कायम शासकीय कार्यक्रमात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांना डावलण्याच्या प्रकार होत आहे, त्यामुळे या नेत्यांनी चिंता व्यक्त केली. संविधान बचाव पदयात्रा, नवी मुंबई एअरपोर्टवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, कुलाब्यातील घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम, वर्षावरील दुष्काळाची बैठक यामध्ये नेत्यांना डावलले जात असल्याने नेते नाराज आहेत. या सर्व नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
BJP Politics In Shirur : शिरूरमध्ये विरोधकांचा 'गेम ओव्हर'! भाजप सत्तेत, सत्तेची दोन्ही महत्त्वाची पदे पाचर्णे कुटुंबाकडे; नगरपरिषदेत विरोधकच उरला नाही

याबाबत अधिक बोलताना शायना एनसी म्हणाल्या, 'एकनाथ शिंदे हे संयमी नेते आहेत, ज्यांना राजकारण करायचंय त्यांना विचारा हे राजकारण का करत आहेत? अनेक कार्यक्रम झाले, ज्यात शिवसेनेला (Shivsena) डावलण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. आम्हाला आमचा अधिकार पाहिजे. आमचा हक्क पाहिजे, नाहीतर तो कसा मिळवायचा हे आम्हाला चांगले माहीत आहे, असेही शायना एनसी म्हणाल्या. गोकुळमध्ये काय करायचे त्याबाबत नेतृत्व ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Devendra Fadnavis PM Race : देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दिशेने 'सुसाट', ‘अपघात’ घडू न देण्याचे आव्हान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.