Thackeray women attack Mahesh Kothare: सूनबाई अपघात प्रकरणात अडकल्याने मुक्ताफळं उधळली जातायत; महेश कोठारेंवर ठाकरेंच्या रणरागिणीचा हल्लाबोल

Kothare accident case News : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
mahesh kothare
Mahesh KothareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ऐन दिवाळीतच राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सणासुदीच्या काळातही सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. बोरिवलीत आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींंचं भरभरून कौतुक केले होते. तर दुसरीकडे सूनबाई अपघात प्रकरणात अडकल्या म्हणून अशी मुक्ताफळे महेश कोठारे उधळत असल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्याने केली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोठारे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतरही महेश कोठारे यांनी मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणाले होते. त्यामुळे हा वाद वाढतच चालला आहे. त्यातच आता या वादात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उडी घेतली आहे. सूनबाई अपघात प्रकरणात अडकल्या म्हणून अशी मुक्ताफळे उधळत असल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

mahesh kothare
Solapur BJP News: जयकुमार गोरेंच्या सोलापूरमधील 'ऑपरेशन लोटस'ला धक्का? मोर्चानंतर सुभाषबापूंच्या मनात 'संशयकल्लोळ', दिला 'हा' सल्ला

याआधी संजय राऊतांनीही महेश कोठारेंवर निशाणा साधला होता. “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे चित्रपट फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तुम्ही असं काही बोलला असाल तर तुम्हाला तात्या विंचू चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल”, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली होती.

mahesh kothare
NCP MLA Politics : उदय सामंतांनी विधानसभा काढताच दादांचा आमदार चार पावलं मागं सरकला; म्हणाले, 'वरिष्ठ नेते व पक्षश्रेष्ठी...'

“ते कलाकार आहेत हे बरोबर आहे, पण एका अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या होत्या. तिला कसं वाचवायचं? तर अशी मुक्ताफळं, सुमनं उधळल्याशिवाय काही होत नाही. जी काही संस्कृती तयार होतेय, मी नाव नाही घेणार, कारण कुठल्याही जातीचा मला अपमान करायचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं आणि शौर्याबरोबर क्रोर्यही दाखवलंय. मी एवढंच म्हणेन. वेळ येते तेव्हा कलाकारांना बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे आठवतात. त्यांचा निषेध आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया पेडणेकरांनी दिली.

mahesh kothare
BJP Pune: वात पेटली! भाजप नेत्यानं पोलीस ठाण्यातच तालुकाध्यक्षांच्या विरोधात फोडले फटाके!

उर्मिला कोठारेचं अपघात प्रकरण

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या ड्राइव्हरने गाडी भरधाव चालवून मेट्रोचे काम करणाऱ्या दोन कामगारांना धडक दिल्याची घटना 28 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री घडली होती. या अपघातात सम्राटदास जितेंद्रदास या कामगाराचा मृत्यू झाला होता, तर उर्मिलासह तिचा ड्राइव्हर गजानन पाल आणि कामगार सुजन रविदास जखमी झाले होते.

mahesh kothare
Shivsena Politic's : नगराध्यक्षपदावर शिवसेनेच्याच अनेकांचा डोळा, मंत्री उदय सामंत यांच्या भावाची लागणार कसोटी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com