viral audio clip controversy : महाराष्ट्राचं राजकारण व्हायरल ऑडिओ क्लिपवरून तापलं, भाजप-शिवसेनेत बिनसलं; राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरण्याची शक्यता!

viral audio clip controversyl News : कॅबिनेट बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Devendra fadnavis Eknath shinde Manoj Jarange Patil
Devendra fadnavis Eknath shinde Manoj Jarange Patilsarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbi News : दसरा मेळाव्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. त्या ऑडिओ क्लिपनंतर महायुतीत मोठा तणाव पहावयास मिळाला. या नंतर महायुतीमधील एकनाथ शिंदेंची शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मंगळवारी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच या कथित ऑडिओ क्लिपचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेली कथित ऑडिओ क्लिपचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी करताच त्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, मंत्री नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली. त्यामुळे या दोन पक्षाच्या नेत्यातच वाद होण्याची शक्यता दिसत असतानाच दोन्ही पक्षाने सामंजस्याची भूमिका घेतली आहे.

त्यातच मंगळवारी होत असलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षाचे मंत्री या कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या चार दिवसापासून या ऑडिओ क्लिपमुळे भाजप आणि शिवसेनेचे आमदार आणि नेते आमने-सामने आले होते.

Devendra fadnavis Eknath shinde Manoj Jarange Patil
BJP vs Shivsena : जरांगेंच्या चौकशीची मागणी करणाऱ्या रामदास कदमांच्या संपत्तीवरून भाजप नेत्याचा हल्लाबोल : "बोरिवलीपासून CST पर्यंतच्या जमिनींची माहिती..."

गेल्या चार दिवसाच्या काळात भाजप (BJP) व शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी थेट भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता.तर भाजपच्या नेत्यांनी देखील शिवसेनेच्या नेत्यांवर पलटवार केला होता. त्यामुळे गेल्या चार दिवसापासून पक्षामधील वातावरण तापलेलेच आहे. त्यातच मंगळवारी होत असलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येणार असल्याने या दोन्ही पक्षात पुन्हा वाद होणार का? याची उत्सुकता लागली आहे.

Devendra fadnavis Eknath shinde Manoj Jarange Patil
Shiv Sena Symbol Case : न्यायाधीशांच्या 'त्या' वक्तव्याने एकनाथ शिंदेंची धडधड वाढली; ठाकरेंच्या शिलेदाराने निशाणा साधला; म्हणाले,'योग्य ठिकाणी धनुष्यबाण...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com