Abdul Sattar Big News: शिंदेंचे खंदे समर्थक अन् मंत्री सत्तार मोठा निर्णय घेणार ? म्हणाले, 'तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यबाण..'

Chhatrapati Sambhajinagar Political News : महायुतीत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंच्या वाट्याला आले असून त्यामुळं बाकीच्यांनी त्यावर बोलू नये असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला लगावला.
Abdul Sattar Eknath Shinde
Abdul Sattar Eknath Shindesarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सध्यातरी सांगता येणे कठीण आहे.त्यात एकीकडे मराठा आणि ओबीसी यांच्यातला संघर्ष, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, विधानसभा निवडणुकीची तयारी असा सगळा झांगडगुत्ता राज्यात सुरू आहे.

याचदरम्यान,आता शिंदे गटाचे मंत्री आणि प्रमुख नेते असलेल्या अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) आता मोठा दावा केला आहे. त्यांनी येत्या 10 दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार असल्याचं विधान त्यांनी केलं आहे.त्यामुळे सत्तारांनी दिलेल्या संकेतांनुसार महायुती सरकार मोठा निर्णय काहीतरी धमाका करणार असल्याची चर्चा आहे.

महायुती सरकारमधील मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात.त्यांच्या रोखठोक भूमिकांमुळे ते कधी कधी स्वत:अडचणीत येतात तर कधी पक्षाला आणतात.आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यबाण असेल.

ज्यादिवशी ते म्हणतील, तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत,त्यादिवशी आमचा करार संपेल असं विधान करुन त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.ते आमचे मालक आहेत. मालकाचा कुणी मालक असतो का?” असं अब्दुल सत्तार यांनी विचारलं.

Abdul Sattar Eknath Shinde
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार

अब्दुल सत्तार काय म्हणाले..?

मंत्री अब्दुल सत्तार यांनी आम्ही एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) नऊ रत्न होतो.त्यात मी देखील आहे. पण आता आठ रत्नातलं एक कमी झालं आहे.आता आठच राहिलो आहे.एक रत्न आम्ही दिल्लीत पाठवल्याची टिप्पणी सत्तार यांनी केली. महायुतीत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंच्या वाट्याला आले असून त्यामुळं बाकीच्यांनी त्यावर बोलू नये असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला लगावला.

पालकमंत्री होण्याची इच्छा...

तसेच छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाविषयी सूचक विधान करतानाच ते म्हणाले, मुख्यमंत्री सांगतील तेव्हा पालकमंत्री होईल. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे मालक आहेत. मालकाचा कुणी मालक असतो का?” असं अब्दुल सत्तार यांनी विचारलं. पालकमंत्री जिल्ह्याच्या व्यक्तीला द्यावे.मला पण पालकमंत्री होण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर आपण टोपी काढणार आहे असेही ते म्हणाले.

Abdul Sattar Eknath Shinde
Mumbai North East Lok Sabha Election Result Live : मुंबई उत्तर पूर्व ठाकरेंचीच? संजय दिना पाटील - मिहिर कोटेचा यांच्यात काँटे की टक्कर

10 दिवसांत ब्रेकिंग न्यूज...

मराठा आरक्षणाविषयीदेखील अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले, महायुती सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करत आहे. येत्या 10 दिवसांत मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले आहे. जरांगे पाटलांच्या अभिनंदनाचा ठराव आपण घेतला होता. बाकीचे खडकु छाप लोक मध्ये येतात, अशी टीका त्यांनी लक्ष्मण हाकेंवर केली.

Abdul Sattar Eknath Shinde
Uddhav Thackeray : विदर्भात राजकीय घडामोडींना वेग, ठाकरे गटाच्या इच्छुकांचा पत्ता कट;'आमदारकी'चा मार्ग खडतर ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com