Abhijeet Dipke : मोदी सरकारला झुकवणाऱ्या अभिजीत दिपकेंचा 'गॉडफादर' कोण? विश्वासू सहकाऱ्यांकडून पहिल्यांदाच खळबळजनक आरोप

Abhijeet Dipke controversy : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सीजेपीच्या दोन दिवसीय बैठकीत आम्हाला का बोलावले नाही? याचा जाब विचारत गुजरातमधून आलेल्या राहुल पांड्या, मनीष ब्रम्हभट्ट या दोन कार्यकर्त्यांनी अभिजीत दिपकेंच्या घरासमोर आंदोलन सुरू केले होते. पोलीसांनी तिथून या आंदोलकांना ताब्यात घेतले होते.
Abhijeet Dipke
CJP activists Rahul Pandya and Manish Brahmbhatt alleged political motives against Abhijeet Dipke during their protest in Chhatrapati Sambhajinagar.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हातात घेऊन समतेची भाषा करणाऱ्या अभिजीत दिपके याचा खरा चेहरा बाहेर आला आहे. तो फक्त एक पॉलिटिकल डीलर आहे, आपचे अरविंद केजरीवाल त्याला ऑपरेट करत आहे, असा गंभीर आरोप अभिजीत दिपके यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सीजेपीच्या दोन सदस्यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सीजेपीच्या दोन दिवसीय बैठकीत आम्हाला का बोलावले नाही? याचा जाब विचारत गुजरातमधून आलेल्या राहुल पांड्या, मनीष ब्रम्हभट्ट या दोन कार्यकर्त्यांनी अभिजीत दिपकेंच्या घरासमोर आंदोलन सुरू केले होते. पोलीसांनी तिथून या आंदोलकांना ताब्यात घेतले होते.

त्यानंतर मागील चार दिवसांपासून हे दोघे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. काल त्यांची प्रकृती खालवल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले. आज य दोघांनी आपले उपोषण मागे घेतले. गुजरातला जाण्यापुर्वी त्यांनी अभिजीत दिपके यांच्यावर गंभीर आरोप केले.

Abhijeet Dipke
Buldhana Crime : गावच्या राजकारणाला कंटाळून लोकनियुक्त सरपंचाने संपवलं जीवन; मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओतून केला खळबळजनक खुलासा

चाळीस दिवस दिल्लीच्या आंदोलनात जंतरमंतरवर आम्ही लाठ्या खाल्या, हजारो विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. पण जेव्हा काही धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा मात्र अभिजीत दिपके याने सीजेपीच्या बैठकीसाठी आपले मित्र, मैत्रीणी, नातेवाईकांना बोलावले.

आम्ही आंदोलन केले तेव्हा पासून ते आजतागायत अनेकदा निरोप देऊन, पोलिसांशी संपर्क साधूनही त्याने आम्हाला साधा एक फोन देखील केला नाही. माझ्या सहकाऱ्याची शुगर चाळीस झाली होती, तो कोणत्याही क्षणी कोमात गेला असता, पण दिपके याने साधी विचारपूस केली नाही.

Abhijeet Dipke
Manoj Jarange Patil : सांगलीत मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; 2 ते 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या; तर कराडात बैठकीचे बॅनर फाडले

अभिजीत दिपके याने आंदोलनात विद्यार्थ्यांचा वापर करून घेतला. हातात संविधान घेऊन समतेची भाषा करतो, पण झारखंड, पंजाबमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्याला जायचे नाही. त्याच्या कोअर कमिटीत पंजाबी, मुस्लिम का नाहीत? असा सवाल या कार्यकर्त्यांनी केली. तर आमच्यावर भाजपचे हस्तक असल्याचे आरोप करत जुने विमानातील फोटो व्हायरल करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप या आंदोलकांनी केला.

आम्ही त्यावर उत्तर द्यायला तयार आहोत, अभिजीतने समोरासमोर येऊन डिबेट करावी, पण त्याआधी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर बोलावे, असे आव्हान या दोन आंदोलकांनी दिपके यांच्यावर केला. दिपके हा आम आदमी पक्षाचा अजेंडा राबवतो आहे, अरविंद केजरीवाल त्याला ऑपरेट करत आहे. तो विद्यार्थ्यांचे हित पाहत नसून एक पॉलिटिकल लिडर म्हणून काम करत आहे, याचा पुनरुच्चारही आंदोलकांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com