Ajit Pawar On CM-DCM News : तुम्ही जय-वीरू, आमच्याकडे सर्जा-राजाची जोडी असायची..

Ncp : पत्रकार मित्रांनाही हे माहीत आहे, पण मी याचा संबंध त्या विधानाशी जोडत नाही.
Cm Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadanvis News
Cm Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadanvis NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : `देशात नरेंद्र, राज्यात शिंदे`, असा उल्लेख असलेल्या जाहिरातीने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कटुता आली होती. (Ajit Pawar On CM-DCM News) त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक जाहीरात प्रसिद्ध करत सगळं काही अलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाला. या जाहिरातींवर कोट्यावधी रुपये खर्च झाले. पण याच्याशी राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना काही देणंघेणं नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनावले.

Cm Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadanvis News
Devendra Fadnavis News : फडणवीस साहेब आपले स्वागत आहे, पण पालकमंत्री देसाई यांना घेवून या...

जाहिरात देवून पुन्हा स्पष्टीकरण देत आमची जोडी म्हणजे जय-वीरूची सांगितले जाते. (Ncp) आमच्याकडे शेतात बैल जोडी असायची, त्यांची नावे राजा-सर्जा असयाची असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे-फडणवीसांना टोला लगावला. मी त्यांच्या त्या विधानाशी संबंध जोडत नाहीये, हे सांगायला देखील ते विसरले नाही.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शहरात आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीराचे उद्घाटन करण्यासाठी अजित पवार आले होते. (Eknath Shinde) तत्पुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नांदेड जिल्ह्यात लागलेल्या ५० खोके १०५ डोके या पोस्टरचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले, राज्यातील राजकारणात सध्या जे सुरु आहे, त्याच्याशी सर्वसामान्यांना काही घेणंदेणं नाही.

विधिमंडळ अधिवेशनात जेव्हा विरोधक `५० खोके, एकमद ओके`, अशा घोषणा द्यायचे तेव्हा अनेक सत्ताधारी गटाचे आमदार आम्हाला लाॅबीमध्ये तुम्ही आमच्यावर अशी टीका का करता? म्हणून विचारायचे. दोन दिवसांपुर्वीच्या जाहीरात प्रकरणाने देखील राज्यात चर्चा झाली. शिंदेच्या शिवसेनेनेच ही जाहीरात दिली होती. त्यानंतर पुन्हा दुसरी जाहीरात देवून सगळं काही सुरूळीत आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न झाला.

पण वाद तुम्हीच निर्माण करायचा आणि त्यावर स्पष्टीकरणही द्यायचे? हे काही बरोबर नाही. त्या जाहिरात प्रकरणानंतर एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमची जय वीरूची जोडी आहे. ये फेव्हिकाॅल का जोड है? हे सांगण्याची वेळ का येते? आमच्याकडे शेतात बैल जोडीची नावे राजा-सर्जा अशी असतात. पत्रकार मित्रांनाही हे माहीत आहे, पण मी याचा संबंध त्या विधानाशी जोडत नाही, असे सांगत अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com