Ambadas Danve : लातूरच्या शेतकऱ्याला बैल दिल्याचा गवगवा; अंबादास दानवेंनी सभागृहात सांगितली सत्य हकीकत!

Political News : गेल्या महिन्यात लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने बैल नसल्यामुळे आपल्या पत्नीला औताला जुपल्याचे छायाचित्र समोर आले होते.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve reacting to Maharashtra Budget 2026 and raising questions over the government’s farm loan waiver announcement.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve reacting to Maharashtra Budget 2026 and raising questions over the government’s farm loan waiver announcement.Sarkarnama
Published on
Updated on

Assembly Session News : गेल्या महिन्यात लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने बैल नसल्यामुळे आपल्या पत्नीला औताला जुपल्याचे छायाचित्र समोर आले होते. त्यानंतर सरकारच्या आदेशाने कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्याला बैल खरेदी करून दिला. त्याचे फोटो, वर्तमान पत्रात बातम्या आल्या, पण दोनच दिवसात तो बैल 'बशा' असल्याचे समोर आले. तो काम करण्या योग्य नव्हता, त्याने मान टाकली. यावरून सरकार आणि कृषी विभागवर टीकेची झोड उठली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मुंबईतून त्या शेतकऱ्याला बाजारात घेऊन जा आणि हवा तसा बैल खरेदी करून द्या, असे आदेश दिले.

त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला नवा बैल मिळाला, पुन्हा त्याचे फोटो सोशल मिडियावर आणि बातम्या वर्तमानपत्रात झळकल्या. प्रत्यक्षात तो बैल सरकार किंवा कृषी विभागाने त्या शेतकऱ्याला घेऊन दिला नव्हता, तर एका संवेदनशील शेतकऱ्याने स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून तो खरेदी करून दिला, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सभागृहात केला. रेणापूरच्या बाजारातून हा बैल खरेदी करून एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला दिला. यात सरकारचा किंवा कृषी विभागाचा एकही रुपया नाही. मुंबईत बसून नुसत्या घोषणा देणाऱ्यांना हे माहीत नाही. मी स्वतः लातूरला गेलो होतो, तेव्हा हा प्रकार मला कळाला, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve reacting to Maharashtra Budget 2026 and raising questions over the government’s farm loan waiver announcement.
Maharashtra Politics Update: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

विधीमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने सध्या त्यांच्याकडे हे पद नसले तरी ते विरोधी पक्षनेते पदाची भूमिका बजावताना दिसत आहे. विधान परिषदेत त्यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेसह विविध मुद्यावरून सरकारवर सडकून टीका केली. लातूरच्या शेतकऱ्याला बैल दिल्याचे सांगत स्वतःची पाठ थोपटवून घेणाऱ्या सरकार, कृषी विभागालाही त्यांनी धारेवर धरत वस्तुस्थिती मांडली.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve reacting to Maharashtra Budget 2026 and raising questions over the government’s farm loan waiver announcement.
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

बैल दिला म्हणून ढोल बडवला, पण तो बैलच काही तासांत मेला, हे सांगताना त्यांनी दानवे यांनी सगळा घटनाक्रमच सांगितला. शेतकऱ्यांच्या सिंचनाकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना घोषित करूनही राज्यांमध्ये सात ते आठ हजार गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असेल तर सरकार या योजनेत पूर्णतः अपयशी ठरल्याचे दानवे म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकरी जगातील सर्वोत्तम दर्जाचा कापूस पिकवतो, पण त्याच्या कष्टाची किंमत देण्याऐवजी सरकार परदेशातून कापूस आयात करण्याचे धोरण राबवत आहे.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve reacting to Maharashtra Budget 2026 and raising questions over the government’s farm loan waiver announcement.
Maratha Bhavan : धनंजय मुंडेंची अडचण वाढणार? 'मराठा भवन'च्या जागेवरून वाद पेटल्यानंतर विरोधक आक्रमक; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीमुळे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com