Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्या समर्थक आमदार, खासदार, मंत्र्यांचा अयोध्या दौरा कुठल्या न कुठल्या कारणाने गाजतो आहे. राज्यात शेतकरी संकटात असतांना अयोध्येचा दौरा केल्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले. त्यातच ठाण्यातील एक सुप्रसिध्द गुंडाला मुख्यमंत्री आपल्या विमानातून अयोध्येला घेवून गेल्याचे प्रकरण समोर आल्याने विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ही संधी साधत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. (Devendra Fadanvis) या संदर्भात दानवे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, काय हा 'फडतूस'पणा ? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले.
आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून, खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालते का? देवेंद्र फडणवीसजी, असा चिमटा देखील दानवे यांनी काढला आहे.
अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या शिंदे-फडणवीस यांच्यासह सरकारमधील सगळ्या मंत्र्यांनी माध्यमांशी बोलतांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावरच टीका केली होती. त्यामुळे हा दौरा रामाच्या दर्शनासाठी होता की मग ठाकरेंवर टीका करण्यासाठी? असा सवाल देखील उपस्थितीत केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.