Ashok Chavan : "गलिच्छ राजकारण केलं, टीका केली आता तोंडघशी पडले" : लढाईला यश येताच अशोक चव्हाणांचं विरोधकांवर तोंडसुख

Nanded Drought News: नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि मुदखेड तालुक्यांचा अखेर दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला. या निर्णयानंतर अशोक चव्हाण यांनी सरकारचे आभार मानत दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकारण केल्याबद्दल विरोधकांवर टीका केली.
Ashok Chavan
Ashok Chavan Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded Drought News: मराठवाड्यासह राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली होती. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ घोषित करताना ७६ पैकी ७४ तालुक्यांचा या यादीत समावेश करण्यात आला होता. मात्र नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांना यातून वगळण्यात आले होते. यावरुन सरकारमधील नेत्यांवर यामुळे टीका केली जात होती.

त्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षाचे खासदार अशोक चव्हाण व इतर लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली होती. दोन तालुके का वगळले? हे सांगा, लोक आम्हाला शिव्या घालत आहेत, असा संताप एका कार्यकर्त्याने अशोक चव्हाण यांना फोन करून व्यक्त केला होता. याची ऑडिओ क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. अखेर या दोन्ही तालुक्यांचा समावेश हा दुष्काळाच्या यादीत झाला आहे.

या निर्णयामुळे आता संपूर्ण नांदेड जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून गृहित धरला जाईल. यानंतर अशोक चव्हाण यांनी समाज माध्यमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे. तर या दुष्काळाच्या काळात राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही खडेबोल सुनावले आहेत.

मुखेड आणि मुदखेड या दोन्ही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती, परंतु काही तांत्रिक कारणामुळे सुरूवातीला या तालुक्यांचा समावेश यादीत करण्यात आला नव्हता. यावरून विरोधकांनी गलिच्छ राजकारण केले, तहसील कार्यालयावर मोर्चे काढले, सरकारवर टीका केली. पण आता ते सगळे तोंडघशी पडले आहेत, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी विरोधकांना उत्तर दिले.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत अखेर समावेश झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या दोन तालुक्यांना सुरुवातीला वगळण्यात आल्याने जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि आंदोलनांचे वातावरण निर्माण झाले होते.

२०२६ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने सुरुवातीला २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला होता. नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांना या निर्णयाचा लाभ मिळाला; मात्र मुखेड आणि मुदखेड हे दोन तालुके वगळण्यात आले होते. पावसातील खंड आणि पर्जन्यमानाच्या तांत्रिक निकषांनुसार या तालुक्यांचा ट्रिगर-१ लागू झाला नसल्याचे कारण देण्यात आले.

Ashok Chavan
Devendra Fadnavis : CM फडणवीसांकडून पुण्यातील नगरसेवकांची शाळा; लोकप्रतिनिधींचही मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणं! बैठकीतील Inside Story

प्रत्यक्षात मात्र पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मुदखेड हा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील तालुका आहे. तसेच तो भोकर विधानसभा मतदारसंघात येतो. भाजपच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासाठीही हा प्रश्न महत्त्वाचा होता. दुसरीकडे, मुखेडचे भाजप आमदार तुषार राठोड यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या नाराजीला सामोरे जाण्याचे आव्हान होते.

अशोक चव्हाण यांनी दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश व्हावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांनी तांत्रिक निकषांमुळे पहिल्या यादीत नावे आली नसल्याचे स्पष्ट करत पुढील प्रक्रियेत समावेशाची अपेक्षा व्यक्त केली होती. दरम्यान, मुदखेड तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याच्या निषेधार्थ २९ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. दुष्काळ जाहीर करण्याच्या शासन निर्णयाची प्रत जाळून निषेध नोंदवला होता.

Ashok Chavan
Kailas Gorantyal : दुष्काळात नोटांचा पाऊस! "भक्तीत इतका तल्लीन होतो की काय झालं कळलंच नाही"; नोटा उधळल्याप्रकरणी कैलास गोरंट्याल यांचं स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी आणि इसापूर धरणातून शेतीसाठी पाणी सोडावे, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या होत्या. पर्जन्यमानाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांत तफावत असल्याचाही आरोप करण्यात आला होता. आज १४ ऑक्टोबर रोजी या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com