Eknath Shinde : चर्चा तर होणारच! गणपतराव गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर भाजप-शिंदे गटाचे पुन्हा एकत्र बॅनर

Kapil Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपील पाटील यांचे कल्याण नगरीत हार्दिक स्वागत
Dombvili Banners
Dombvili BannersSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर शिंदे गट आणि भाजप यामध्ये धुसफूस पाहिला मिळाली. यानंतर आज मात्र या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे बॅनर्स एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात उलटसुटल चर्चांना उधाण आले आहे.

खासदार कपील पाटील (Kapil Patil) यांच्या लोकसभा परिसरातील गौरी पाडा येथील सिटी पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गौरी पाडा परिसरात खासदार कपील पाटील आणि एकनाथ शिंदे यांचे एकत्र पोस्टर पहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे हे पोस्टर भाजपच्या माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी लावले आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व येथे भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धूसपूस असली असली, पाहिला मिळत असली तरी दुसरीकडे कल्याण पश्चिम येथील विकास कामांच्या उद्घाटनासाठी कार्यकर्ते एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली पाहिला मिळाली.

Dombvili Banners
Ashok Chavan : गेल्या वर्षीची अफवा, यंदा खरी ठरली; भाजपबाबत अशोक चव्हाण काय म्हणाले होते ?

आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले. आमचे कोणतेही श्रेय आम्हाला देत नाही, माझे बरेच पैसे मुख्यमंत्र्यांकडे आहेत, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही या संदर्भात अनेक वेळा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचेही समोर आले. मात्र वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घातले नसल्याचा आरोपही होत आहे.

Dombvili Banners
Ashok Chavan : जिकडे अशोक चव्हाण, तिकडे समर्थक आमदार? नांदेड काँग्रेसची वाट बिकट...

या सगळ्या प्रकारानंतर भाजप आणि त्यातील धूसफूस स्पष्टपणे दिसत होती. दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीदेखील झाडल्या गेल्या. आज मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या गौरी पाडा उद्घाटनाप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक दया गायकवाडांनी कपील पाटील आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे एकत्र पोस्टर लावले आहेत. या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपील पाटील यांचे कल्याण नगरीत हार्दिक स्वागत आहे असे म्हटले आहे.

सिटी पार्क नेमके कसे आहे...

कल्याणमधील गौरीपाडा येथील एक लाख २१ हजार ६०० चौरस मीटर जागेत कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाने सीटी पार्क विकसित केले आहे. मनोरंजन, विरंगुळ्याचे प्रशस्त ठिकाण यानिमित्ताने कल्याण शहराच्या वेशीवर उपलब्ध झाले आहे. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे वालधुनी नदीच्या काठी टाऊन पार्क या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर सीटी पार्क विकसित करण्यात आले आहे. ६९ कोटी ६६ लाख रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत. नवी दिल्लीतील मेसर्स डिझाईन ॲकॉर्ड या समंत्रक संस्थेच्या प्रकल्प अहवालानुसार सीटी पार्कची उभारणी करण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Dombvili Banners
Raigad Loksabha 2024 : रायगड लोकसभेवर भाजपचा दावा पण शिंदे गटाचा आमदार म्हणतोय; यंदाही तटकरेच खासदार...!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com