Eknath Shinde strategy: राज्यसभा हुकलेल्या नेत्याला आता थेट केंद्रात मोठी जबाबदारी? एकनाथ शिंदेंच्या आश्वसनांनंतर नाराजी दूर होणार

Shiv Sena internal politics update News : एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करीत पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी दिली. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेले माजी खासदार गजानन कीर्तिकर, आनंद अडसूळ व राहुल शेवाळे हे तिघेजण ही नाराज झाले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे एका जागेसाठी इच्छुक असलेल्या मंडळींची संख्या पाहता उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागली. त्यातच एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करीत पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी दिली. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेले माजी खासदार गजानन कीर्तिकर, आनंद अडसूळ व राहुल शेवाळे हे तिघेजण ही नाराज झाले.

दुसरीकडे शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेत असलेले राहुल शेवाळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. त्यानंतर शेवाळे नाराज असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. त्यातच दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत राहुल शेवाळे यांची गुप्त बैठक झाली. त्या बैठकीत शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या राहुल शेवाळे यांच्यावर केंद्रात शिवसेनेची संघटनात्मक मोठी जबाबदारी सोपवण्याची तयारी एकनाथ शिंदेंनी दर्शवली आहे. त्यानंतर आता शेवाळे यांची नाराजी दूर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) अपेक्षित यश मिळाले नाही. विशेषतः या निवडणुकीची सर्व जबाबदारी राहुल शेवाळे यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुका झाल्यापासून धनशक्ती खर्च करून मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नगरसेवक फोडले होते. त्यामुळे ५० ते ६० नगरसेवक निवडून येतील, असा कयास शिवसेनेकडून लावण्यात आला होता. मात्र, मुंबईत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळेच ऐनवेळी शेवाळे यांची उमेदवारी कापण्यात आली असल्याची चर्चा आहे.

Eknath Shinde
Ashok Kharat News: कॅप्टन खरातचा मुखवटा टराटरा फाटणार! तपासाची जबाबदारी धडाकेबाज IPS अधिकाऱ्याकडे!

राज्यसभेसाठी उमेदवारी न दिल्याने शिवसेना खासदार राहुल शेवाळे प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. राहुल शेवाळे हे पक्षात दुसऱ्या स्थानावर आहेत. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आठवडा झाला तरी शेवाळे यांची नाराजी दूर झालेली नव्हती. त्यातच सोमवारी रात्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी पीएम मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री मंत्री उदय सामंत हे राहुल शेवाळे यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले.

Eknath Shinde
Iran war : इराणचा जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर हल्ला; युध्दाला गंभीर वळण, भारतावर काय परिणाम होणार?

दिल्लीत आल्यानंतर राहुल शेवाळे हे श्रीकांत शिंदे यांना भेटले. दिल्लीत ल्यानंतर शेवाळे यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी शेवाळे यांच्याकडे लवकरच पक्षाचे केंद्रातील एखादे महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेवाळे यांच्याकडे नवीन जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. या भेटीत शेवाळे यांची नाराजी दूर झाली का नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

Eknath Shinde
Assam Election: भाजपची पहिली यादी जाहीर: मुख्यमंत्री सातव्यांदा मैदानात: काँग्रेसमधून आलेल्या बोरदोलोईंनाही उमेदवारी, 11 विद्यमानांचा पत्ता कट

दरम्यान, याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काम करणाऱ्यांचा सन्मान केला जाईल, असे सांगत शेवाळेंना योग्य स्थान देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात शेवाळे यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार व या जबाबदारी नंतर तरी राहुल शेवाळे यांची नाराजी दूर होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
Sarpanch Politics : सरकारचा निर्णय अडचणीत! ग्रामपंचायतींच्या प्रशासकांवर आर्थिक बंदी; मुंबई हायकोर्टचा मनाई आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com