

Pune News : राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार विनोद तावडे यांच्यात काही काळ शीतयुद्ध किंवा मतभेद असल्याच्या चर्चा झाल्या, विशेषतः २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांची बोरिवली मतदारसंघातून उमेदवारी कापण्यात आली. तेव्हापासून काही काळ दोन्ही नेत्यांचे संबंध ताणले गेल्याचे बोलले गेले.
पण अलीकडच्या काळात दोघांनी सार्वजनिक पातळीवर सहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसून आळे होते. पक्ष संघटनेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत ते एकत्र काम करत असल्याचे दिसते. अशात आता तावडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे.
विनोद तावडे यांनी वारीमध्ये सहभाग घेतला होता. यवेळी माध्यमांशी संवाद साधला. आपण याच ठिकाणाहून माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतो. यंदाही आलो आहे. माऊलींसह पंढरीच्या विठुरायाकडे राजकीय काहीही मागितलं नाही. पण राज्यातील, देशातील जनतेला सुखी ठेवा. आपला देश जगात नंबर एक होवो हीच मागणी आपण केल्याचं सांगितलं.
यानंतर पत्रकारांनी "आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १५ वर्षांपूर्वी पासून वारीत सहभागी केले होते. वारीच्याच पुण्याईने त्यांना मुख्यमंत्री पदावर संधी मिळाली आहे. आपल्याला ही संधी मिळावी आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळावी असे वाटतं नाही का?" असा प्रश्न विचारला. यावर विनोद तावडे यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
तावडे म्हणाले, सेवा करणं महत्वाचं आहे. कोणत्या पदावर जाऊन सेवा करावी असं काही नाही. मी जे मुख्यमंत्री पदावर राहून केलं असतं, तेच आज देवेंद्रजी करताहेत. मला असं वाटतं की, देवेंद्र फडणवीस काय किंवा अजून कोणी, कोणीही असो, जनतेची चांगली सेवा करणारे त्या पदावर असणं गरजेचं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री जनतेची खूप चांगली सेवा करत असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीसांचं कौतुकही तावडेंनी केलं.
भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हे त्यांच्या पत्नीसह श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जेजुरीच्या खंडेरायाचा निरोप घेऊन वाल्मिक ऋषीच्या वाल्हे गावाकडे मार्गस्थ होत असताना यात सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश बिडकर, राजेंद्र शिळीमकर, वर्षा तापकीर यांच्यासह भाजपचे स्थानिक नेतेमंडळीही वारीत दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.