High Court News : बालकाच्या मृत्यू प्रकरणी पोलीस आयुक्तांना खंडपीठाची नोटीस!

In a serious development, the Aurangabad Bench of the High Court has issued a notice to the Police Commissioner : दैविक अविनाश आघाव या पाच वर्षे सहा महिने वयाच्या बालकाचा वेदांत हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे 6 मे 2024 रोजी मृत्यू झाला होता.
Bombay High Court bench Aurangabad News
Bombay High Court bench Aurangabad NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : वेदांत हॉस्पिटल मधील डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेल्या दैविक आघाव प्रकरणाचा तपास सीआयडी अथवा सीबीआयकडे वर्ग करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. प्राथमिक सुनावणीत गृह सचिवांसह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस निरीक्षक कुंदन जाधव, कृष्णा शिंदे यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत.

दैविक अविनाश आघाव या पाच वर्षे सहा महिने वयाच्या बालकाचा वेदांत हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे 6 मे 2024 रोजी मृत्यू झाला होता. (Aurangabad High Court) या प्रकरणी पालक अविनाश आघाव यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात डॉक्टरांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता. मात्र पोलिसांनी हे प्रकरण मेडिकल बोर्डाकडे अभिप्रायासाठी पाठवले.

मेडिकल बोर्डाने निष्काळजीपणा झाल्या बाबतचा अहवाल पोलिसांना 25 ऑक्टोबर 2024 रोजी दिला. त्यानंतर पोलिसांनी (Police) या प्रकरणी 27 नोव्हेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल केला. परंतु सदरील प्रकरणामध्ये सखोल तपासणी केली नाही, आरोपींना अटक केलेली नाही. सदरील घटनेतील साहित्य जप्त केलेले नाही, गुन्हा दाखल होऊन पाच महिने झाले तरी सदरील प्रकरणात योग्य ती तपासणी झाली नाही.

Bombay High Court bench Aurangabad News
High Court News : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणाचा चौकशी अहवाल अंतिम करू नये!

हा गुन्हा सीआयडी किंवा सीबीआयकडे वर्ग करण्याची विनंती केली तरीही अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे याचिका दाखल करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम नियुक्त करावी किंवा तपास सीआयडी, सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा. तसेच सदरील प्रकरणांमध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचा हस्तक्षेप थांबवावा.

Bombay High Court bench Aurangabad News
High Court News : कुठल्याही मंत्री, सचिवांना जीआर काढून न्यायीक अधिकार वापरता येणार नाहीत!

ज्या अधिकाऱ्यांनी तपासामध्ये विलंब केला त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणी गृहसचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस, निरीक्षक कुंदन जाधव, कृष्णा शिंदे यांना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. याचिकाकर्त्या तर्फे अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com