Shalarth ID Scam : बोगस शिक्षक घोटाळ्यात ‘वसुली’चा दणका; सेवा समाप्त झालेल्या ७३ शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर

Beed Fake Teacher Recruitment Scam News बीड जिल्ह्यातील गाजलेल्या बोगस शिक्षक भरती व वेतन घोटाळ्याने आता निर्णायक वळण घेतले असून तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीची शिक्षण आयुक्तांकडे उपसंचालकांकडून शिफारस करण्यात आली आहे.
Teacher Recruitment Scam
Teacher Recruitment ScamSarakrnama
Published on: 
Updated on: 

Beed News : बीड जिल्ह्यातील गाजलेल्या बोगस शिक्षक भरती व वेतन घोटाळ्याने आता निर्णायक वळण घेतले असून, सेवा समाप्त केलेल्या ७३ बोगस शिक्षकांनी उचललेल्या वेतनाच्या वसुलीची जबाबदारी थेट शिक्षणाधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, अनियमित वैयक्तिक मान्यता दिल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याची शिफारस छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण आयुक्त, पुणे यांच्याकडे केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, पद मंजूर नसताना किंवा पद उपलब्ध नसताना दिलेल्या नियुक्त्या व वैयक्तिक मान्यतांच्या प्रकरणात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णयानुसार, बनावट कागदपत्रे, संच मान्यतेतील अनियमितता आणि बोगस विद्यार्थी दाखवून झालेल्या भरतीप्रकरणी प्राथमिक विभागातील ७ आणि माध्यमिक विभागातील ६६ अशा एकूण ७३ शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

त्यानुसार, पूर्वलक्षी प्रभावाने दिलेल्या नियुक्तीप्रकरणी आणि संबंधित शिक्षक नियमित कार्यरत नसल्याच्या कारणावरून १३ नोव्हेंबर २०१९ ते ९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीतील वेतन वसूल करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांची राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नियुक्तीच्या वेळी पद उपलब्ध नसताना तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रदान केलेली वैयक्तिक मान्यता अनियमित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Teacher Recruitment Scam
Malegaon Shalarth ID Scam : मालेगावच्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी घरातून उचललं, शिक्षक भरती घोटाळ्यात अडीच महिन्यांपासून होते फरार

त्यामुळे संबंधित तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याची शिफारस शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या आदेशाची प्रत माहितीस्तव शिक्षण आयुक्त (महाराष्ट्र राज्य, पुणे) तसेच शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे) यांना पाठवण्यात आली असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी (जि. प. बीड), मुख्याध्यापक व संबंधितांना पुढील कार्यवाहीसाठी कळवण्यात आले आहे. यापूर्वीच उचललेल्या वेतनाचा हिशेब व वसुली कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Teacher Recruitment Scam
Shalarth ID Scam : शिक्षकांना मोठा धक्का; जुना पगार मिळणार नाही : 80 कोंटीच्या थकीत वेतनाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा; अन्यथा हायकोर्टात जाणार - इनामदार

बोगस शिक्षक भरती व वेतन घोटाळ्यात केवळ सेवासमाप्तीवर न थांबता संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी आक्रमक मागणी सामाजिक कार्यकर्ते इंजि. सादिक इनामदार यांनी केली आहे. बनावट संच मान्यता, बोगस विद्यार्थी आणि शालार्थ आयडीद्वारे शासकीय तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या संस्थाचालक, वेतन अधीक्षक, शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना सहआरोपी करावे, तसेच या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलकडे सोपवून आपल्याला विनाशुल्क पोलीस संरक्षण द्यावे, अन्यथा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्याचा इशारा इनामदार यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.