Beed Crime : बीडमध्ये 45 लाखांच्या लाच घेताना उचललेल्या वन अधिकाऱ्याच्या घरावरही धाड; रोख रक्कम, सोने जप्त

Beed Bribery Case : पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावर असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
Beed Bribery Case
Beed Bribery Casesarkarnama
Published on
Updated on

Anti Corruption News : बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून घरी परतताच वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड याने 45 लाखांची लाच घेतल्याचा खळबळजनक प्रकार काल उघडकीस आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लखमावाड यांना रंगेहाथ पकडले होते.

विशेष म्हणजे, पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावर असतानाच हा लाचखोरीचा प्रकार आणि वन विभागाच्या अधिकाऱ्याला अटक झाल्याने प्रशासन हादरून गेले. दरम्यान, या प्रकरणी श्रीनिवास लखमावाड याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एसीबीच्या पथकाने कालच लखमावाड यांच्या नांदेड येथील घरावर धडक दिली होती.

या झाडाझडतीमध्ये काही रोख रक्कम आणि तीन तोळे सोने पथकाच्या हाती लागल्याची माहिती आहे. श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तपासाचा फास आवळला आहे. लखमावाड याला आज बीड न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Beed Bribery Case
Nashik Bribery Case : नाशिकमध्ये पहिल्यांदाच असं घडलं... PhonePe'वर लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार; बदली झालेल्या PSIवर ACBचा गुन्हा

दरम्यान, एसीबीच्या पथकाने आरोपीच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी येथील मूळ निवासस्थानी तसेच बीड येथील घराची कसून झडती घेतली. या कारवाईत 1 लाख 7 हजार रुपयांची रोकड आणि 3 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, या सर्व मालमत्तेची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे.

वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या प्रलंबित कामांसाठी लखमावाड यांनी ही लाच मागितली होती. एसीबीने रचलेल्या सापळ्यात ते जाळ्यात अडकले. लखमावाड यांचा दरमहा पगार सुमारे दीड लाख रुपये असताना, त्यांनी एकाच वेळी 45 लाखांची प्रचंड लाच मागितल्यामुळे त्यांनी यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर अवैध संपत्ती गोळा केली असल्याचा संशय एसीबीला आहे.

Beed Bribery Case
Tiroda bribery case : लाचखोर भाजप नगराध्यक्षावर गुन्हा दाखल; चक्क हातावर लाचेचा आकडा लिहिला अन्..., ACBच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

या अनुषंगाने लखमावाड व त्यांच्या कुटुंबीयांची सर्व बँक खाती, लॉकर आणि गुंतवणुकीची तपासणी केली जात असून, ही सर्व खाती तातडीने गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील वन सेवा परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवून सेवेत आलेल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर एवढ्या मोठ्या लाचखोरीची कारवाई झाल्याने वन विभागासह प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com