Narendra Modi Sabha For Pankaja Munde : ...अखेर पंकजा मुंडेंच्या मदतीला PM मोदी; बीडला 'या' दिवशी घेणार सभा

Beed Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा विजयी व्हाव्यात, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकाधिक सभा घेण्याचे नियोजन महायुतीकडून केले जात आहे.
Narendra Modi Sabha For Pankaja Munde
Narendra Modi Sabha For Pankaja MundeSarkarnama

Beed News : महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या सर्वच लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहेत. तसेच ज्या लढतींकडे 'हाय व्होल्टेज' लढती म्हणून पाहिले जात आहे त्यात बीड लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. उमेदवारी जाहीर होण्यापासूनच हा मतदारसंघ मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.येथे भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत थेट पंकजा मुंडेंनाच उमेदवारी दिली आहे.

तर मुंडेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे.पण बीडचा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याकडे राखण्यासाठी आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मदतीकरिता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसावले आहेत.

Narendra Modi Sabha For Pankaja Munde
Pankaja Munde News : भर पावसात पंकजा मुंडेंचे भाषण; 'मोदींनी दिलेली संधी वाया घालवू नका'

भाजपने पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने त्यांना बीडमधून उमेदवारी दिली. यानंतर पंकजा यांनीही प्रचाराचा धडाका लावतानाच 'शेवटची संधी द्या' अशी भावनिक साद घातली आहे. याचवेळी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बीडला येत्या 10 मे रोजी सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मोदींची सभा पंकजा मुंडेंसाठी बूस्टर ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बीड लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मराठवाड्यात मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाचा मोठा फटका लोकसभेच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.त्यातच ओबीसी समाजाच्या नाराजीचा परिणाम उमेदवारांवर होणार आहे.त्याच पार्श्वभूमीवर भाजपसह महायुतीकडून सावधगिरीची पावलं उचलण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून नांदेड, लातूर,धाराशिव यानंतर आता पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातील लोकसभेच्या अधिकाधिक जागा विजयी व्हाव्यात, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकाधिक सभा घेण्याचे नियोजन महायुतीकडून केले जात आहे.पहिल्या, दुसऱ्यानंतर आता तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांत लोकसभेचे मतदान होत असलेल्या मतदारसंघात मोदींच्या सभांचा झंझावात सुरु आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील 14 उमेदवारांच्या प्रचारासाठी चार दिवसांमध्ये नऊ जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) घेणार आहेत.तर यापूर्वी 29 एप्रिल आणि मंगळवारी 30 एप्रिल या दोन दिवशी पश्चिम महाराष्ट्रात सहा सभा मोदींनी घेतल्या आहेत.त्यामुळे काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण जोरदार तापणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Narendra Modi Sabha For Pankaja Munde
Omraje Nimbalkar : चिंचा फोडून ओमराजेंना केली निवडणुकीसाठी 1600 रुपयांची मदत; चिमुकलीच्या मदतीने निंबाळकर भावूक...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com