Beed News : कसला अवमान? सभागृहात गोंधळ घालत असल्याचा उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांचा विरोधकांवरच निशाणा!

Sarika Kshirsagar alleges opposition councillors News : दोन दिवसापूर्वी झालेल्या बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नहेमीप्रमाणे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये सभागृहात खडाजंगी झाली.
beed nagrplika
beed nagrplika Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed News : बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील गोंधळाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कारभाराविरोधात भाजप नेते योगेश क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादीने विरोधकांना सुनावले आहे. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी कसला अवमान? आम्ही कायम महिलांचा आदरच करतो, विरोधकांच्या वागण्यामुळे बीड शहराचे नुकसान होत असल्याचा आरोपही मुळूक यांनी केला.

दोन दिवसापूर्वी झालेल्या बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नहेमीप्रमाणे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या (BJP) नगरसेवकांमध्ये सभागृहात खडाजंगी झाली. भाजपाच्या गट नेत्या सारिका क्षीरसागर यांनी आम्हाला बोलूच दिले जात नाही,असा आरोप करत काही कामांना सभागृहात चर्चा न होताच मंजुरी कशी दिली? नगरसेवक बाहेर पडल्यानंतर सतरा कामांना मंजूरी कशी दिली? असा सवाल करत भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले होते.

विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सत्ताधारी उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. 'कसला अवमान'? आम्ही तर त्यांना सन्माननीय ताई म्हणूनच संबोधतो,असे सांगत सारिका क्षीरसागर यांचा कोणताही अवमान झालेला नसल्याचे मुळूक यांनी स्पष्ट केले.वर्कऑर्डर निघाली म्हणजे भ्रष्टाचार झाला असे होत नाही. काम पूर्ण होण्यापूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप करणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सभात्याग करून काय साध्य केले? वारंवार सभागृहात गोंधळ घालण्याऐवजी शहराच्या विकासासाठी सहकार्य करा. तुमच्या या भूमिकेमुळे केवळ सत्ताधाऱ्यांचे नव्हे, तर संपूर्ण शहराचे नुकसान होत आहे, अशा शब्दांत मुळूक यांनी विरोधकांना सुनावले. बीड शहराचा कायापालट करण्याचा आमचा निर्धार असून विकासकामांमध्ये अडथळे आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

beed nagrplika
Beed News : बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, नगरसेवक बाहेर पडले; मग 17 ठराव मंजूर कसे झाले? भाजपाने विचारला जाब

बीड नगर परिषदेच्या ३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत महिला नगरसेविकेचा कथित अवमान, सत्ताधारी नगरसेवकांची आक्षेपार्ह वक्तव्ये आणि विरोधकांच्या अनुपस्थितीत ठराव मंजूर केल्याच्या आरोपांमुळे मोठा गदारोळ झाला. या प्रकरणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

beed nagrplika
Maharashtra Politics Live Update : पुणे पदवीधरच्या निवडणुकीत ठाकरेंचे फोटो अन् चिन्हाचा वापर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राऊतांनी सुनावलं

सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर एकूण १८ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप घेतला. पहिल्या विषयांवरील चर्चा पूर्ण न होता पुढील विषय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. घनकचरा व्यवस्थापन, डम्पिंग ग्राउंड, स्लॉटर हाऊसची रखडलेली कामे आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा हिशेब यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नगरसेवक अमर नाईकवाडे आणि डॉ. सारिका क्षीरसागर यांच्यात शाब्दिक वाद झाला. नाईकवाडे यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मात्र, अमर नाईकवाडे यांनी हे आरोप फेटाळले. सारिका क्षीरसागर घरगुती भाषेत बोलत असल्याने आपण केवळ सभागृहाच्या शिस्तीची आठवण करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

beed nagrplika
Nashik: कोर्टाच्या आदेशानंतर भाजपकडून स्विकृत नगरसेवकांची घोषणा, पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी आणला नवा फॉर्म्युला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.