Shivsena News : मुंडे अन् क्षीरसागर कुटुंबानंतर बीडमध्ये पुन्हा 'काका-पुतण्या'मध्ये राजकीय 'महाभारत', शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का!

Beed NCP News: मुंडे आणि क्षीरसागर घराण्यांनंतर आता जगताप घराण्यात लागलेली कौटुंबिक वादाची ही ठिणगी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजलगाव आणि बीड जिल्ह्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार, हे आता निश्चित मानले जात आहे.
Mohan Jagtap And Rambhau Jagtap .jpg
Mohan Jagtap And Rambhau Jagtap .jpgSarkarnama
Published on
Updated on

कमलेश जाब्रस

Beed Politics : बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि 'काका-पुतण्या' यांच्यातील संघर्षाचा अतिशय जुना आणि रंजक इतिहास आहे. सत्तेच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी काकांनी घेतलेले निर्णय आणि त्याला आव्हान देत पुतण्यांनी पुकारलेले बंड, हा बीडच्या मातीचा जणू राजकीय पॅटर्न बनला आहे. आता माजलगावच्या जगताप कुटुंबात काका मोहनराव जगताप आणि पुतण्या रामभाऊ जगताप यांच्यात उडालेला भडका हा याच काका-पुतण्या वादाच्या परंपरेचा नवा अंक मानला जातो.

कौटुंबिक अंतर्गत वादातून सख्खा पुतण्या आणि माजी नगरसेवक रामभाऊ जगताप यांनी काका मोहनराव जगताप यांच्या नेतृत्वाला उघड आव्हान देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून जगताप कुटुंबाने तालुक्यात आमदार, जिल्हा परिषद सदस्य ते नगरसेवक पदांपर्यंत एकजुटीने सत्ता उपभोगली. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत काका मोहन जगताप यांनी पुतण्या रामभाऊंना डावलून स्वतःच्या मुलाला स्वीकृत नगरसेवक केले.

या पुत्रप्रेमामुळे जगताप कुटुंबात नाराजीची ठिणगी पडली, जिचे रूपांतर आता थेट राजकीय बंडखोरीत झाले आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात काका कितीही बलाढ्य असला, तरी एका विशिष्ट टप्प्यावर पुतण्या बंडखोरीचे निशाण फडकवतो आणि काकाला थेट आव्हान देतो, हा इतिहास आहे. मुंडे आणि क्षीरसागर घराण्यांनंतर आता जगताप घराण्यात लागलेली कौटुंबिक वादाची ही ठिणगी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजलगाव आणि बीड जिल्ह्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार, हे आता निश्चित मानले जात आहे.

बाजीराव जगताप यांनी 1995 ला माजलगाव विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपला सुटल्यामुळे अपक्ष म्हणून ढाल तलवार या चिन्हावर निवडणूक लढवली होती व ते विजयी झाले होते. यानंतर त्यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. या कारखान्याचे अध्यक्ष असणारे बाजीराव जगताप यांच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्यामुळे माजलगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती आली तर त्यांचे पुत्र मोहन जगताप या छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत.

Mohan Jagtap And Rambhau Jagtap .jpg
Shivsena UBT : खासदार फुटीनंतर ठाकरे अलर्ट! 'तो' पदाधिकारी शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू होताच नगरसेवकांना मातोश्रीवर हजर राहण्याचे आदेश

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले मोहन जगताप यांचा अल्पमताने पराभव झाला. त्यांचे पुतणे रामभाऊ जगताप यांनी मोहन जगताप यांचे सक्रिय काम केले होते. राजकीय इच्छाशक्ती व महत्त्वाकांक्षा असल्यामुळे रामभाऊ जगताप यांनी छत्रपती कारखान्याचे संचालक व मोठेवाडी गावचे सरपंच अविनाश गोंडे माजी नगरसेवक ईश्वर होके यांच्यासह सहकारी मित्रांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळामध्ये शिवसेनेने रामभाऊ जगताप यांना मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिल्यास निश्चितच मोहन जगताप यांच्या राजकीय वाटचालीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

Mohan Jagtap And Rambhau Jagtap .jpg
Sinnar FDA Action: धक्कादायक! सिन्नरच्या दूध भेसळीच्या कारवाईवर मोठं प्रश्नचिन्ह; 'एफडीए'च्या छापेमारीत संशयितच अधिकाऱ्यांच्या मदतीला; 'मास्टरमाईंड' फरार

मुंबईत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रामभाऊ जगताप यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत ईश्वर होके, मोठेवाडीचे सरपंच अविनाश गोंडे यांच्यासह अनेक आजी-माजी सरपंच, सोसायटी चेअरमन आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि धनंजय पापा सोळंके यांनी प्रयत्न केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com