Shivsena UBT : खासदार फुटीनंतर ठाकरे अलर्ट! 'तो' पदाधिकारी शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू होताच नगरसेवकांना मातोश्रीवर हजर राहण्याचे आदेश

Nashik Shivsena corporators : संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी या चर्चेनंतर नाशिकला भेट दिली. पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व नगरसेवकांनी पक्षावर निष्ठा व्यक्त केली. पक्षाचा एक पदाधिकारीच शिंदेंच्या गळ्याला लागला आहे. या पदाधिकाऱ्याला नगरसेवकांना फोडण्याचे काम सोपविले असल्याचे बोलले जाते.
Eknath shinde & Uddhav Thackeray
Eknath shinde & Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 14 Jul : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सातत्याने उद्धव ठाकरेंच्या लोकप्रतिनिधींना आमिषे दाखविली जात आहेत. त्यामुळे नाशिकचे नगरसेवक फुटणार ही चर्चा सुरू होताच पक्षप्रमुख सावध झाले आहेत.

गेल्या आठवड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 12 नगरसेवक फुटणार अशी चर्चा सुरू झाली. त्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एजंट नेमल्याची चर्चा होती. हा एजंट कोण? हे माहीत असूनही पदाधिकारी त्यावर गप्प आहेत.

संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी या चर्चेनंतर नाशिकला भेट दिली. पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व नगरसेवकांनी पक्षावर निष्ठा व्यक्त केली. पक्षाचा एक पदाधिकारीच शिंदेंच्या गळ्याला लागला आहे. या पदाधिकाऱ्याला नगरसेवकांना फोडण्याचे काम सोपविले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पक्षातील पदाधिकार्‍यांमध्येच परस्परांवर अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.

Eknath shinde & Uddhav Thackeray
Shrirampur Crime Protest :'टोपीपेक्षा भगव्या उपरण्याचीच भीती'; श्रीरामपूर हत्याकांडानंतर भाजपच्या महिला नेत्याचे खळबळजनक विधान

या प्रकाराची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवकांना आता मातोश्रीवर हजर होण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. बुधवारी (ता. १५) मुंबईत या नगरसेवकांची बैठक होणार आहे.

Eknath shinde & Uddhav Thackeray
Jayant Patil: जयंत पाटलांना थोपवण्यासाठी थेट मंत्रालयातुन 'फिल्डिंग'? निकटवर्तीयावरील कारवाईविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला कमकुवत करणे हे एकमेव उद्दिष्ट घेऊन सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांची सर्व टीम कामाला लागली आहे. तो महायुतीमध्ये आपल्या राजकीय प्रभाव वाढविण्याचा भाग असल्याचे बोलले जाते. त्यासाठी शासकीय विकास निधीचे आमिष दाखविले जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या बैठकीत काय होते? याची उत्सुकता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com