Shivsena News : "आता जरांगे पाटील आणि जनताच माझा पक्ष..." शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाची पक्षाला सोडचिठ्ठी

Anil Jagtap Resigned Eknath Shinde Shivsena: "आता आम्ही मनोज जरांगे पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी अर्ज काढा सांगितल्यानंतर आम्ही कायम मतदारसंघात काम करत असल्याने निवडणूक लढवावी लागणार असल्याची भूमिका मांडली होती. त्यावर त्यांनी होकार दिला आहे. शिवाय यापुढे आपण कोणत्याच पक्षात जाणार नाही."
Eknath Shinde, Anil Jagtap, Manoj Jarange Patil
Eknath Shinde, Anil Jagtap, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 12 Nov : 'यापुढे मनोज जरांगे पाटील व जनताच आपला पक्ष असेल'. असं म्हणत शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत इथून पुढे आपण कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचं अनिल जगताप यांनी जाहीर केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बीड जिल्ह्यातील एकमेव जागाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात टाकल्यामुळे या निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनचा धनुष्यबाण हे चिन्ह दिसणार नाही. मात्र, बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाताच अनिल जगताप हे बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

39 वर्षांपासून शिवसेनेचे काम करणारे जगताप मागील 18 वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात देखील ते सक्रिय असतात. शिवसेनेने मागच्या वर्षी हाती घेतलेला 'होऊ दे चर्चा' कार्यक्रम जरांगे पाटील यांचे आंदोलन शांत झाल्यानंतर घ्यावा अशी भूमिका त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली होती.

Eknath Shinde, Anil Jagtap, Manoj Jarange Patil
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : शाळेतील विद्यार्थीनीही सुरक्षित नाहीत - शरद पवार

त्यामुळे आपल्याला पक्षातून काढल्याचा आरोप अनिल जगताप यांनी केला होता. दरम्यान, जानेवारीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करताना आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय राहणार व निवडणूक लढविणार या दोन अटी घातल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केल्यानंतरच आपण प्रवेश केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच आपल्यावर 2009 पासून अन्याय होत आहे. मागच्या निवडणुकीतही ऐनवेळी पक्षात आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी दिली. आता आम्ही जरांगे पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Eknath Shinde, Anil Jagtap, Manoj Jarange Patil
Babanrao Lonikar Video : मराठा समाजाबाबत केलेलं 'ते' वादग्रस्त वक्तव्य भाजप उमेदवाराला भोवणार?

त्यांनी अर्ज काढा सांगितल्यानंतर आम्ही कायम मतदारसंघात काम करत असल्याने निवडणूक लढवावी लागणार असल्याची भूमिका मांडली होती. त्यावर त्यांनी होकार दिल्याचंही जगताप म्हणाले. शिवाय यापुढे आपण कोणत्याच पक्षात जाणार नाही आणि आपला पक्ष मनोज जरांगे पाटील व जनताच असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com