

Beed Crime News : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मस्साजोगप्रमाणेच धक्कादायक आणि अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली असून, ज्या पद्धतीने दिवंगत संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली होती, तसाच प्रकार गेवराई तालुक्यातील उमापूर येथे उघडकीस आला आहे. येथे एका ऊसतोड मजुराचे उचलीच्या पैशासाठी अपहरण करून तब्बल चार दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, ऊसतोड मजुराच्या तोंडात लघुशंका केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. याही पेक्षी धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे. या ऊसतोड मजुराचे नाव देविदास कापसे असे आहे.
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची घटना आता पुन्हा एकदा ताजी झाली आहे. देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांना डांबून ठेवत जबर मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या अंगावर लघुशंका देखील करण्यात आली होती. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यासह राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
आता अशीच घटना गेवराई तालुक्यातील उमापूर येथे घडली आहे. ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे उचलीच्या पैशासाठी अपहरण करण्यात आले. तब्बल चार दिवस डांबून ठेवत त्यांना रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, ऊसतोड मजुराच्या तोंडात लघुशंका केल्याचा आरोप देखील समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे आता जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, देविदास कापसे हे उमापूर येथील रहिवासी असून ते ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. दरम्यान, त्यांच्यात आणि मुकादम गणेश थोरात यांच्यात उचल परत करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातूनच मुकादम थोरात याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने देविदास कापसे यांचे अपहरण केले.
या अपहरणाच्या घटनेनंतर देविदास कापसे यांच्या आईने गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व माहिती पोलिसांना दिली. तसेच तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. यावरून आता पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, मुकादम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चार दिवस देविदास कापसे यांना एका ठिकाणी डांबून ठेवून अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, कापसे यांच्या तोंडात लघुशंका केल्याचा आरोपही आता करण्यात आला आहे. तर या घटनेची माहिती मिळताच स्थानिक सरपंचांनी मध्यस्थी करत देविदास कापसे यांची सुटका केली.
ज्यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून मुकादम गणेश थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच या घटनेनंतर ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.